स्वर्गीय गणेश धुरींच्या कुटुंबाला जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत
नाशिक :आपण एकटे नाही आहोत मराठी पत्रकार परिषद आपल्या पाठिशी आहे ही जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं अडचणीत आलेल्या किंवा मयत पत्रकारांना मदत कऱण्याची भूमिका मराठी पत्रकार परिषदेने घेतली आहे.भास्कर चोपडे यांच्या उपचारासाठी आणि त्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत केल्यानंतर परिषदेशी संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघानं गणेश धुरी याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून पत्रकाराच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.–

दैनिक लोकमतचे  पञकार कै . गणेश धुरी याच्या अपघाती निधनाने नासिक जिल्हय़ातील पञकारीतेवर व त्याच्या कुटूंबावर दुखा:चे सावट पसरले होते. या अशा दुःखद प्रसंगी धुरी कुटूबिंयाच्या मागे नासिक जिल्हा पञकार संघ ऊभा राहिल फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आथिॅक मदत व त्याच्या भवितव्याचा दुष्टीने उदरनिर्वाहसाठी नोकरीसाठी प्रयत्न करेल अशा आशयाचा नासिक येथे तिन महिन्यापूर्वी शोकसभेत नाशिक जिल्हा पञकार संघाचे तथा मराठी पञकर परिषदेचे  यशवंतराव पवार साहेब यांनी सात्वंणानिक शब्द दिला होता. दिलेला शब्द पुणॅ करण्यासाठी गुरूवार दि. 21/3/2018 रोजी दुपारी पञकाराचे पंचप्राण पवार नसिक जिल्हा पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे , नाशिक जिल्हा पञकार संघाचे खजिनदार सुभाष पुरकर , दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक तथा संघाचे पदाधिकारी चंद्रशेखर शिंपी , निफाड तालुका पञकार संघाचे संतोष गिरी आदीच्या उपस्थित एकवीस हजाराचा धनादेश श्रीमती गायञी गणेश धुरीकडे सपुर्त करून संघाने आपला एक शब्द पुर्ण केला 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here