संसार तर मोडला…पुढे ?

0
1255

टस्थापनेच्या मुहूर्तावर भाजप-सेना यांच्यात घटस्फोट झालेला असला तरीे ही काडीमोड  अचानक झालेली नाही.लोकसभा निवडणुकांचे निकाल ज्या दिवशी  लागले त्याच दिवशी त्याची बिजं रोवली गेली होती.अंदाज असे होते की,भाजपला 230-240 च्या आसपास जागा मिळतील .त्यामुळं मित्रपक्षांची भाजपला गरज भासेल. शिवसेना,अकाली दल आणि अन्य मित्रांना घेऊन  नरेंद्र मोदी दिल्लीतील सत्ता स्थापन करतील.तसं झालं असतं तर राज्यातली भाजप-सेना युती नक्कीच तुटली नसती.कारण मुंबईत असा प्रयत्न झाला असता तर त्याचे  धक्के थेट दिल्लीत बसले असते.मुंबईतील युती तुटण्याबरोबरच दिल्लीतलं सरकारही कोसळलं असतं.शिवसेनेच्या दुर्दैवानं असं झालं नाही.केंद्रात भाजपला  अनपेक्षितपणे स्पष्ट बहुमत मिळालं.भाजपला स्वबळावर सरकार स्थापन कऱण्यासाठी हव्या असणाऱ्या जागंापेक्षा दहा-बारा अधिक म्हणजे 283 जागा  मिळाल्यानं भाजपच्या लेखी  शिवसेनेच्या 18 जागांचं( आणि पर्यायानं शिवसेनेचंही )  मोल आपोआपच कमी झालं.याची जाणीवही भाजपनं लगेच शिवसेनेला करून दिली.एनडीएतील शिवसेना हा दुसऱ्या क्रमाकाचा मोठा पक्ष असतानाही शिवसेनेची अवघ्या एकाच मंत्रीपदावर बोळवण केली गेली.मोंदींची ही कृती शिवसेनेसाठी हलाहल पचविण्यासाऱखी होती..एक कॅबिनेट आणि किमान दोन राज्यमंत्रीपदं मिळावीत ही शिवसेनेची मागणी मान्य झाली नाही. खातं वाटप करताना देखील मग शिवसेनेच्या जखमेवर मीठ रगडलं गेलं.अनंत गीते यांना अवजड उद्योग हे खातं दिलं गेलं.हे खातं शिवसेनेच्या लेखी बिनकामाचं होतंं. िएवसेना गेली तीन महिने या अवजड झालेल्या खात्याचं ओझं वाहात होती.त्यामुळं एक सुप्त नाराजी शिवसेनेच्या नेर्तृत्वाच्या मनात होती.सेनेच्या देहबोलीतून ती व्यक्तही होत होती.तथापि परिस्थितीच अशी होती की,मनातल्या मनात धुमसत बसण्याखेरीज शिवसेना काहीच करू शकत नव्हती. त्यावर थांबा आणि वाट पहा अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली.  शिवसेनेचं हे धुमसणं  भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना नक्कीच गुदगुदल्या करणारं होतं. “कशी जिरवली”  अशीही काही भाजप नेत्यांची भावना होती.शिवसेनेला वेसण घालण्याची हीच वेळ आहे याची जाणीव झालेल्या भाजप नेत्यांनी मग तशी पाऊले उचलायला सुरूवात केली.शतप्रतिशत चे नारे पुन्हा बुलंद व्हायला लागले होते. मुख्यमंत्री आमचाच होणार अशा गर्जना केल्या जाऊ लागल्या होत्या. त्यासाठी पक्षांतर्गत अर्धाडझन दावेदारही निर्माण झाले होते.  मोदींच्या  करिष्म्यामुळेच  शिवसेनेला 18 जागा मिळाल्याचे देखील कोकलून सांगितलं जात होतं. .मोदी लाटेत शिवसेना न्हाऊन नि धाली हे सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईकडंही भाजप दुर्लक्ष करीत नि घाला होता. “शिवसेनेनं विधानसभेच्या वेळेस जास्त खळखळ करू नये,आपण थोरले भाऊ आहोत ही कल्पना सोडून किमान जुळ्या भावाच्या नात्यानं आपल्याशी व्यवहार करावा” अशी या मागं योजना होती.भाजपची पाऊलं कोणत्या दिशेनं आणि कशासाठी  पडताहेत हे सेना नेत्यांच्या ध्यानात यायला उशिर लागला नाही.,त्यातूनच  मग मिशन 151 चा नारा सेनेकडून दिला गेला.सेनेचा हा नाराच युतीच्या गळ्यातील हड्डी बनून राहिला असं आज म्हणता येईल.” कोणत्याही परिस्थितीत 151च्या खाली यायचं नाही हा  सेनेचा नि र्धार होता तर  कुठल्याही परिस्थितीत सेनेला 150च्या खाली खेचायची ज णू शपथच भाजपनं घेतली होती.” ,दोन्ही बाजू अशा प्रकारे इर्षेला पेटलेल्या असल्यानं ,आणि विषय तुटेल इथंपर्यत ताणला गेल्यानं त्याचे परिणाम आज आपण बघ तो आहोतच.एक गोष्ट नक्की की,महायुती टिकली पाहिजे असं दोन्ही  बाजुंच्या काही नेत्यांना प्रामाणिकपणे वाटत होत.  स्वतः नरेंद्र मोदींचीही तशी इच्छा नक्की असावी असे म्हणता येईल .त्यांनी प्रयत्नही करून पाहिले. “हरियाणातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा जनहित कॉग्रेसनं भाजपपासून फारकत घेतली होती.ति थंही जागा वाटपावरूनच वाद झालेला होता.दुसरा एक मित्र पक्ष अकाली दलही फार समाधानी आहे असं  दिसत नाही.तेव्हा पंचवीस वर्षांपासूनचा मित्र असलेली शिवसेना जर विभक्त झाली तर भाजपला मित्र टिकविता येत नाहीत किंवा सत्ता आल्यानं भाजपला मित्रांची गरज उरलेली नाही, किंवा छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना भाजप संपवून टाकतो अशी आपली आणि  पक्षाची प्रतिमा तयार होऊ शकते याची मोदींना भिती होती”. त्यामुळं सुरूवातीला युती टिकवा असा आदेशच त्यांनी महाराष्ट्रातील आपल्या नेत्यांना दिला होता.युती टिकावी यासाठी भाजपचं केंर्दीय नेतृत्व जे प्रयत्न करीत होते त्याला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील निकालाची देखील पार्श्वभूमी होती.बिहार असेल,उत्तर प्रदेश असेल,राजस्थान असेल नाही तर मोदींचे  गुजरात असेल या सर्वच राज्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आहेत.त्यातून आता मोदी हवा राहिली नाही अशी च र्चा देशभर सुरू होती.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका भाजपसाठी फारच महत्वाच्या होत्या.”महाराष्ट्र जिंकून मोदी लाट ओसरली नाही”  हे देशाला दाखवून देता येईल अशी भाजपच्या थिंक टॅन्कची कल्पना होती.म्हणूनच   किमान या निवडणुकीपुरती तरी युती टिकली पाहिजे असंच भाजपला वाटत होतं..मात्र भाजपला ज्या कारणंासाठी युती टिक ावी असं वाटत होतं ती कारणं शिवसेनेसाठी भाजपचं नाक दाबायला उपयुक्त ठरणारी होती. उत्तर पदेश,गुजरात,राजस्थानमधील निकालानं सेनेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या  होत्याच.शिवसेनेच्या मनातील तो आनंद सामनातून व्यक्तही झाला होता.काही प्रमाणात का होईना पोटनिवडणुकांच्या निकालानं देशात निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ आपण उठवावा आणि “शेफारून जाऊ नका,वातावरण बदलत आहे याची जाणीव करून देत आपला घोडा पुढं रेटावा”  अशी सेनेची आखणी  होती.या साऱ्या घटना,घडामोडी आणि नेत्यांचे अहंकार युती तोडण्याला कारणीभूत ठरल्या  आहेत. युती तुटण्याचं आणखी एक सुक्ष्म कारण लक्षात घेतलं पाहिजे.ज्यांनी आज युती तोडली आहे त्यापैकी कोणीही युतीचे शिल्पकार नव्हते.ते होते बाळासाहेब आणि प्रमोद महाजन.आज ते दोघेही नाहीत.  दोन्ही बाजुंची सूत्रं आज तरूण नेतृत्वाच्या हाती गेलेली आहेत.तारूण्याचा एक उन्माद असतो,आपल्या हिंमतीवर काही करून दाखविण्याची उर्मी असते,यातून पूर्वजंानी करून ठेवलेल्या गोष्टी त्याज्य किंवा टाकावू वाटू लागतात.आपलं कर्तृत्व दाखविण्याचीही खुमखुमी असते.जे आयतं  मिळालेलं असतं त्याचं महत्व वाटत नाही. ए खाद्या दिवट्या पोरानं बापजाद्यानं महतप्रयासानं कमविलेलं संचित उधळून लावावं असा काहीसा हा प्रकार असतो. – सत्ता मिळविण्याच्या नादात,स्वतःचं मोठपण सिध्द कऱण्याच्या प्रय़त्नात ही युती विचारांची होती हे दोन्ही बाजु विसरल्या. युती करण्यासाठी आणि  नंतर ती  टिकविण्यासाठी प्रमोद महाजन असतील किंवा बाळासाहेब असतील यांना  कितने पापड बेलने पडे  याचाही विसर  दोन्ही बाजुंच्या विद्यमान नेत्याना  पडला .या सर्वांपेक्षा दोन्ही बाजुंना आपले इ गो महत्वाचे वाटले.

भाजप-सेनेच्या नेत्यांना अहंकाराला मुठमाती देता आली असती आणि  महायुती टिकविता आली  असती  तर सत्ता मिळविणं कठिण नव्हतं.आज तसं होईलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.याचं कारण आघाडीतही बिघाडी झालीय,अन राज्यात पंचरंगी सामने  होत आहेत. राज्याच्या राजकारणात अशी स्थिती पहिल्यांदाच नि र्माण झालेली असल्यानं कोणाची सत्ता येईल  अंदाज कऱणंही कठिण आहे. एवढंच कशाला मी निवडणून येणारच याची खात्री कोणत्याही पक्षातला कोणीही नेता देऊ शकत नाही. अशी अनिश्चितता निर्माण झाली आहे.सर्व पक्ष एकएकटे लढले तर काय होईल याचे अंदाज  काही संस्थानी यापुर्वी व्यक्त केलेले आहेत.या अंदाजानुसार  भाजपला शंभरच्या आसपास जागा मिळणार आहेत.शिवसेना साठ-सत्तरवर थाबेल.दहा जागाच मनसेच्या पदरात पडतील.राष्ट्रवादी तीस-चाळीस आणि कॉग्रेस त्यापेक्षा थोड्या अधिक जागा मिळवेल.हा अंदाज खरा ठरला तर बघा,सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा भाजपला शिवसेनेचीच मनधरणी कऱणं भाग आहे.-भचजपलाही हे वास्तव माहिती आहे.त्यामुळंच आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही अशी नरमाईची भूमिका भाजप नेत्यांना घ्यावी लागली आहे.आज आपण सेनेला शिव्या घातल्यातर 16 ऑक्टोबरनंतर त्यांच्याच पाया पडण्याची वेळ येईल तेव्हा आपली अडचण होऊ नये याची तजविज भाजपनं आजच करून ठेवली आहे. निवडणुकांत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा कळीचा ठऱणार आहे.आपल्याशिवाय भाजपचे सरकार सत्तेवर येऊ शकत नाही हे वास्तव जेव्हा शिवसेनेला उमगेल तेव्हा जागा कमी असल्या तरी  सेना मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा कदापिही सोडणार नाही हे नक्की.शिवाय केंद्रातही काही पदं वाढवून मागितली जातील. बदलत्या परिस्थितीत सेनेच्या अटी भाजपला मान्य कराव्याच लागतील.हे मान्य करायचं नसेल तर भाजपला राष्ट्रवादीचा एक पर्याय उपलब्ध असेल.ंपण “ज्यांच्यांवर गळा फाटेपर्यत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.ज्यांना सत्ता आल्यावर तुरूंगात पाठविण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत”त्यांच्याबरोबर बसायचे काय?  हा प्रश्न निर्माण होईल.राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापन करायची म्हटलं तरी गाठ अजित पवार यांच्याशी असल्यानं किती दिवस हा संसंार चालू शकेल हा ही प्रश्न असेल..शिवाय निवडणुकीनंतर कोण कोणाबरोबर असेल याचा याचाही अंदाज करणं अशक्य आहे.कदाचित राष्ट्रवादी- सेनाही एकत्र येऊ शकतात,मनसे-भाजपही बोहल्यावर उभं राहू शकतात, अगदी टोकाचा विचार करायचा तर शिवसेना आणि मनसे हे दोन पक्षही एकत्र येऊन प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याची मानसिकता असलेल्या भाजपाला अक्कल शिकवू शकतात.आणि भाजपचे मित्रपक्ष असलेले जानकर,शेट्टी,मेटे यांनाही भाजपच्या जातीयवादाचा,धर्मान्धतेचा आणि मनूवादी विचारांचा  नव्यानं साक्षात्कार होऊन ते आघाडीच्या  बाजूला जाऊ शकतात. “बुधवारी रात्री भाजपला धोकेबाज म्हणणारे,अशा धोकेबाजांबरोबर आम्ही गेलो त्यामुळं आम्ही राज्यातील जनतेची माफी मागतो असे बोलणारे युतीतील छोटे पक्ष गुरूवारी सकाळी  पुन्हा भाजपचे गुनगाण गाऊ लागले होते”. या पार्श्वभूमीवर कुछ भी हो सकता है  . नाही तरी गेल्या वीस-पंचवीस दिवसातील घडामोडींमुळं कोणाचाच कोणावर विश्वास उरलेला नाही.सारेच परस्परांकडं सं़शयाच्या नजरेनं बघताना दिसताहेत. त्यामुळं निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येईल, ? कोण मुख्यमंत्री होईल? याचं अनुमान करणं भल्या भल्या राजकीय पंडितांसाठीही अशकय आहे..

                   शेवटी प्रश्न शिल्लक राहतो तो मराटी माणसाच्या अगतिकतेचा.जनतेकडं दुर्लक्ष करीत सत्तेसाठी भांडणाऱ्या नेत्यांच्या राजकारणाचा खरोखरच मराठी माणसांना आता उबग आलेला आहे.विश्वासानं मान खांद्यावर ठेवावी असा कोणताही पक्ष आज शिल्लक नाही.ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यानीच मान कापली असं गेली साठ वर्षे चाललंय.त्यासाठी कधी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा,कधी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा,कधी विदर्भ वेगळा कऱण्याचा,कधी हिंदुत्वाचा ,कधी महाराष्ट्राला स्वायतत्ता देण्यासारखे भावनिक मुद्दा उपस्थित करून तर  कोणी धर्मनिरपेक्षतेचा,कधी जातीयवादी शक्तीना दूर ठेवण्याचा विचार मांडत तर कधी विकासाची स्वप्न दाखवित सर्वपक्षीय राजकारण्यांनी मराठी जनतेचा वापरून घेतले आहे.आताही तेच सुरू  आहे  आम्ही मात्र टाळ्या आणि शिटट्या वाजवत स्वतःची फसगत करून घेत राहणार आहोत.मराठी माणसाची अडचण अशीय की,त्यांना उपलब्ध पाचही पर्याय मान्य नाहीत पण त्यातून त्यांना एकाची निवड करावी लागणार आहे.ज्यांची आपण  निवड करणार आहोत त्यांना दगडापेक्षा विटकर मऊ असं म्हणन्यासारखी देखील स्थिती नाही ही मतदारांची खरी शोकांतिका आहे.

एस.एम.देशमुख  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here