परिषद जो विषय हाती घेते तो तडीस नेते,
हिंगोलीः मराठी पत्रकार परिषद जो विषय हाती घेते तो तडीस नेते हे आज पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.हिंगोली पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर हल्ला झाला नंतर परिषदेने राज्यभर राण उठविले.हल्ला झाल्याचे समजताच परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस अनिल महाजन कळमनुरीत पोहोचले.परिषदेशी जोडलेला कोणताही पत्रकार एकटा नाही याचं दर्शन या निमित्तानं राज्यातील पत्रकारांना झालं.गृह राज्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय लावून धरला गेला.अखेर आज या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.हल्ला नेमका का केला हे आता स्पष्ट होणार आहे.हल्लेखोरांचा तोष्णीवाल यांना जिवे मारण्याचाच उद्देश होता,सुदैवाने ते वाचले.आता त्यांची प्रकृत्ती सुधारत आहे.-

LEAVE A REPLY