कोकणी माणसाला काय मिळाले?

0
1133

रायगड लोकसभा मत दार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यंाच्या गेल्या चार दिवसात दोन मोठ्या सभा अलिबागला  झाल्या.दोन्ही बाजुंच्या “खास्या सवाऱ्यांनी” सभांना उपस्थिती लावली.अपेक्षा अशी होती की, महाराष्ट्राचे धुरंधर नेते कोकणात येत आहेत म्हटल्यावर  किमान कोकणातील प्रश्नंाना हात घालतील.त्यावर भूमिका मांडतील.आम्ही सत्तेवर आलो तर कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचं पुन्हा स्वप्न दाखवतील,विविध प्रश्नांच्या जंजाळात अडकलेल्या कोकणी माणसाला दिलासा देतील.दुदैर्वानं असं काही झालं नाही.महायुतीच्या नेत्यांनी व्यक्तीगत आगपाखड करीत आघाडीच्या नेत्यांवर टीका केली..महाआघाडीच्या नेत्यांनी आम्ही दिल्लीत काय दिवे लावलेत ते सांगत नरेंद्र मोदींवर हल्ले चढविले.जाता जाता शरद पवारंानी शेकापलाही चावे घेतले.निवडणूक लोकसभेची आहे म्हटल्यावर राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा  कऱणं,आपल्या पक्षानं कोणती कामं केली हे सांगणं यात काही गैर नाही.किंबहुना ते सांगायलाच हवं.पण म्हणून काही ज्यांच्याकडं तुम्ही मतं मागायला आलात त्या स्थानिकांच्या प्रश्नांबद्दल कमालीची उदासिनता दाखवत ऩुसत्याच आरोळ्या  ठोकायच्या हे संतापजनक आहे.अनेकदा निवडणूक काळात दिली जाणारी आश्वासनं फसवी असतात.निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे त्या आश्वासनाचा सर्वच राजकीय पक्षांना सोयीस्कर विसर पडलेला असतो हे ही खरं असलं तरी आम्ही सत्तेवर आलो तर आपल्या भागातील जनतेसाठी काय करणार आहोत हे स्पष्ट कऱणं पक्षाचं कर्तव्य असतं आणि ते जाणून घेण हा मतदारांचाही अधिकार असतो.कर्तव्य  बजावणारे आणि अधिकार मागणाऱे अशा दोन्ही घटकांना याचा विसर पडलेला असल्यानं विकासाच्या प्रश्नावर चर्चा  करावी किंवा त्यासाठी आग्रह धरावा असंही कोणाला वाटत नाही.विकासाच्या प्रश्नावर बोलायचं तर त्यासाठी किमान त्याभागातील प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो ते आधुनिक पुढाऱ्यांसाठी कठिण काम असल्यानं” कोकणचा अूुन ुशेष भरून निज्ञाला पाहिजे” अशी ठोबळ वाक्य उपस्थितांच्या तोंडावर फेकून वेळ मारून नेली जाते .कोकणाचा अ नुशेष आहे हे साऱ्यानाच माहित आहे त्यात नवीन ते  काय ? पण तो कसा भरून काढायचा हे तर सांग भल्या माणसा.तेवढ्या खोलात जायची कोणाची तयारी नसते.शिवाय निवडणूक काळात प्रसारमाध्यमाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही स्टेटमेंट करावी लागतात.त्यामुळं प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपलं भाषण कसं आक्रमक झालं हे दाखविण्याची,माध्यमांचं लक्ष स्वतःकडं वेधून घेण्याची देखील अहमहमिका लागलेली असते.प्रतिस्पर्ध्याला शिव्या दि्‌ल्या की,कार्यकर्ते टाळ्या वाजवतात.मिडियावाले हेडलाईन दाखवतात,लोकांच्या हाती काय लागतं ? काहीच नाही.कोकणातील दोन्ही मत दार संघात सध्या हेच चित्र आहे.उध्दव ठाकरे,गोपीनाथ मुंडे असतील किंवा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा प्रचारात फिरणारे स्थानिक नेते असतील  कोणीच कोकणाच्या विकासावर ब्र काढायला तयार नाही.खाली नारायण राणेंना चिंता आहे,राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्यांना कसं पटवायचं याची ,अनंत गीते यांना चिंता आहे ती,रामदास कदमांची मंतं आपल्या पारड्यात कशी ओढायची,जयंत पाटील यांना त्रस्त केलंय ते,शिवसेना झाली,मनसे झाली आता पुढील युती कोणाबरोबर करायची याची.अंतुले आणि खानविलकरांचं खरं तर खरोखरच आशीर्वाद देण्याचंच वय आहे पण ते एकाला आशीर्वाद देतात आणि दुसऱ्याच्या नावानं बोटं मोडताहेत.या सर्व खेळातून खेळ खेळणाऱ्यांची हौस तर भागेल पण कोकणाचं काय होणार ?

अलिबागच्या सभेत नारायण राणे कोकणाच्या विकासाबद्दल बोलले नाहीत पण त्यांनी इको सेन्सटिव्ह झोनचा एकमेव मुद्दा उपस्थित केला.इको मुळे कोकणाचा विकास थांबेल असं भाकित वर्तविणाऱ्या नारायण राणे यांनी इको झोन लागू व्हायच्या आधि तरी कोकणाचा कोणता विकास झालाय हे जर विस्तारानं सांगायला हवं होतं.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मान्य केलंय की,कोकणच्या विकासाचा अ नुशेष राहिला आहे.कोकणाचा अ नुशेष शिल्लक आहे हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आपण विदर्भाला दोन हजार कोटीचं पॅकेज दिल्याचं सांगितलं.कोकणाला काय दिलं?  हे मात्र त्यांनी सांगितलं नाही,उलट इकोच्या मुद्‌द्यावर त्यांनी नारायण राणे यांचीच री ओढत “पर्यावरणाच्या प्रश्नावर अतिरेक नको” अशी भूमिका जाहीरपणे माडत कोकणच्या निसर्गाशी आपल्याला काहीच देणं नाही हेच अप्रत्यक्ष दाखवून दिलंय. अनेक तज्ज्ञ असं सागतात की,मराठवाडा आणि विदर्भात अलिकंडं झालेली गारपीट ही पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानं झालीय.एका झटक्यात झालेलं  अब्जावधीचं नुकसान आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेलं असतानाही आपले मुख्यमंत्री म्हणतात पर्यावरणाचा अतिरेक नको.प्रदूषणाचा अतिरेक ज्यंाना थांबवता येत नाही ते आता पर्यावरण टिकविण्याच्या विरोधात भूमिका घेतात हे सारे चिड आणणारे आहे. इकोचं खापर सुरेश प्रभू आणि एनडीए सरकारवर फोडताना आता म्हणजे नि र्णय घेणारं दिल्लीतलं सरकार आपलं आहे हे नारायण राणे  विसरले.माधवराव गाडगीळ असतील किंवा कस्तुरीरंगन असतील हे तज्ज्ञ भले काहीही म्हणोत शेवटी नि र्णय सरकारला घ्यायचा असतो.सरकारने पर्यावरणाचा विचार करून योग्य नि र्णय घेतला असं ज्यांचे हितसंबंध गुतंलेले नाहीत अशा साऱ्यांनाच वाटतं .अशा स्थितीतही इको सेन्सेटीव्ह झानला विरोध करणे हा प्रचाराचा मुद्दा कसा काय होऊ शकतो हेच कळत नाही. – प्रचाराचाच मुद्दा करायचा तर तळ कोकणातील

बेरोजगारी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो.स्वातंत्र्यानंतर आज जवळपास सत्तर वर्षानंतरही  कोकणातील अनेक घरातील चूल जर मुंबईहून येणाऱ्या मनिऑर्डरव पेटत असेल तर या साऱ्या पुढाऱ्यांनी मिळून कोकणात काय केलंय हा प्रश्न शिल्लक राहतो.सरकारनं रायगडला औद्योगिक जिल्हा म्हणून जाहीर केलं,रत्नागिरीला फलोत्पादन जिल्हा घोषित केला गेला आणि सिंधुदुर्गाला पर्यटन जिल्हा असा बहुमान दिला गेला.हे सारं ठिकय पण या धोषणांचं नियोजन तसं झालंय का?  उत्तर नाही असं आहे  .कारण रायगडमध्ये औद्योगिक जिल्हा जाहीर करताना इ थॅं केवळ केमिकल झोन तयार केला.त्याचे दुष्परिणाम रायगडची जनता आता भोगतेय.नवे उद्योग रायगडच्या बोडक्यावर मारताना त्यातून स्थानिकांचा काहीही फायदा होणार नाही याची ज णू काळजीच घेतली गेली.सरकारकडून आलेले अनुभव फारशे चांगले नसल्यानं येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत आहे.नवी मुंबई विमानतळ असेल,एसइझेडचे प्रकल्प असतील,दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडेर असेल किंवा अन्य प्रकल्प असतील या साऱ्या प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे.काय कारण आहे या विरोधाचं? .विकास कोणाला नको असतो काय ?पण असं नाही होत.विकास ठराविक घटकांचाच होतोय.स्थानिक भूमीपूत्र देशोधडीला लागतोय.विस्थापितांच्या पुनर्वसानाचे प्रश्न पन्नास -पन्नास वर्षे झाली तरी सुटत नसतील तर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कशासाठी धनदांडग्यांच्या हवाली करायच्या ? – यावर कोणी भाषण करीत नाही.रायगडात सध्या हजारो कारखाने आहेत तरीही रायगड संपन्न झालाय,येथील भूमीपूत्र आनंदाचं जीवन जगतोय इथल्या मच्छिमारांसमोर आता काही समस्याच नाही असं चित्र नाही.उलटपक्षी भूमीपुत्रांच्या विवंचनात हजारपटीनं भर पडलीय.कारखान्यात नोकऱ्या मिळत नाही.जमिनी गेल्या आहेत.उपजिविकेचं साधन राहिलं नाही.नैराश्यचं मळभ प्रत्येक नागरिकाच्या मनात नि र्माण झालंय.जी शेती थोडीफार टिकलीय ती,कधी कवडीमोल दरानं काढून घेतली जाईल याची चिंता आहे.जी धऱणं आहेत त्याचं शेतीला दिलं जाणारं पाणी कापून ते कधी मुंबईकडं किंवा कारखानदारीकडं वळविलं जाईल याची काळजी स्थानिकांना झोप येऊ देत नाही.ेएकीकडं सरकारकडून शेतकरी मारला जातोय तर दुसरीकडं निसर्गही शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करीत नि घाला आहे.सुपिक जमिनीत समुद्राचे पाणी घुसून ती नापिक होत आहे.अगोदरच रायगडमध्ये ्र32 हजार हेक्टर खार जमिन आहे.त्यात नव्यानं भर पडत आहे.हे कोणाला दिसत नाही काय? की हा विषय निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही? .जी स्थिती शेतक़ऱ्याची तिच मच्छिमाराची .कोकणातील मच्छिमारीच धोक्यात आली आहे.याचं कारण एकतर वाढत्या प्रदूषणामुळं मासळीच कमी होत आहे आणि दुसरीबाब म्हणजे परप्रातिय मच्छिमारांचही अतिक्रमण झालंय.नव्या आधुनिक बोटींच्या माध्यमातून धनदांडग्या कंपन्या आता हा व्यवसाय करू लागल्यानं मुळचा मच्छिमारही संकटात सापडलाय.हा प्रश्न निवडणूक प्रचाराचा कसा काय होऊ शकत नाही.लाखो लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्नंाकडं दुर्लक्ष करून स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं आणि कोणी नुसती बघ्याची भूमिका घेतली हे असे भावनिक विषय उकरून काढत मुळ मुद्दयालाच बगल देण्याचा प्रय़त्न सुरू आहे.तो हाणून पाडला पाहिजे.

 औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगडची ही तऱ्हा तर फलोत्पादन आणि पर्यटन जिल्हा असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.फलोत्पादन वाढविले गेले असते आणि पर्यटनाचा खऱ्या अर्थानं विकास केला गेला असता तर कोकणातल्या लाखो तरूणांना बेकारीत जि णं ज गावं लागलं नसतं.पर्यटन विकासाला कोकणात भरपूर वाव आहे पण आपल्या कुटुंबांच्या बाहेर ज्यांना काहीच दिसत नाही अशा नेत्यांचा गराडा कोकणाला पडलेला असल्यानं त्याअंगानं कोणी त्याचा विचारच करीत नाही.कोकणाला जे निसर्गानं दिलंय ते ही जर हिरावून घ्यायचं असेल तर इ थला पर्यटन विकास कसा होईल हे कळायला मार्ग नाही.रत्नागिरीत फळप्रक्रिया कऱणारे उद्योग आले पाहिजेत,आणि सिंधुदुर्गचा विकास पर्यटन डोळ्यासमोर ठेऊन व्हायला हवा हे अनेकांनी अनेक वेळा सूचविलेलं आहे मात्र तेही होत नाही.मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या पर्यटकाला जर पर्यटनाला जायचं असेल तर त्याला थेट गोवा तरी आठवतं किवा केरळ तरी.कोकणात पहाण्यासारखं गोव्या पेक्षा आणि केरळ पेक्षाही बरंच काही आहे हे आम्ही घाटावरच्या पब्लिकला कळूच दिलेलं नाही.परिणामतः – पर्यटक येत नाहीत.पर्यटकाला कोकणात यायचं तर रस्ते तरी धड हवेत.तेही नाही.कोकणात एकूलता एक मुंबई-गोवा हा महामार्ग आहे.तो मृत्यूचा महामार्ग झालेला आहे.या महामार्गावरून जाताना हमखास अपघात होतोच होतो अशी या महामार्गाची बदनामी झालेली असल्यानं बाहेरचे राहूच द्या,मुंबईकरही कोल्हापूरमार्गे खाली सावंतवाडीला किंवा कणकवलीला जातात.या महामार्गाचं चौपदरीकरण झाल तर अपघात थांबतील,पर्यटन वाढेल असं एकाही पक्षाला कधी वाटलेलं नाही.रायगड आणि कोकणातील पत्रकारानीच हा विषय हाती घेतला आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली.पत्रकारांची ही आंदोलनं सुरू असताना एकाही पक्षानं साधी कोरडी सहानुभूती देखील दाखविली नाही.सारेच बघ्याची भूमिका घेऊन होते आता पहिला टप्पा होतोय.पण पुढचं काय? आम्ही निवडणून आलो तर महामार्गाचं काम मागी लावू असं कोणीही बोलत नाही याचा अ र्थ त्यांना हा महामार्ग झालेलाच नकोय किंवा हा विषय मतं मिळवून देणारा नाही असं राजकीय पक्षांना वाटतंय.ेएन.एच.-17 चा विषय निज्ञाला की,काही जण सागरी महामर्गाचा विषय काढतात.सागरी महामार्ग झाला आणि एनएनच-17 देखील चौपदरी झाला तर कोकणावर काय आकाश कोसळणारय का?  पण हे सारं मुद्दाम लक्ष विचलित कऱण्यासाठी केल जातं.हे केलं जातंय .कोकणातल्या पुढाऱ्याना साधी रेल्वे कोकणात थांबविता येत नाही.कोकणातून जाणाऱ्या गाड्या बघत बसणं आणि आपल्या जमिनी रेल्वेच्या घश्यात घालणं एवढंच काय ते कोकणी माणसाच्या हाती उरलं आहे.आमच्या गावात गाडी थांबवा यासाठी सामांन्य माणसाला रस्त्यावर यावं लागतं यासारखं वैषम्य वाटावी अशी दुसरी गोष्ट नाही.

– प्रश्न काही गंभीर आहेत,काही खऱोखरच किरकोळ आहेत.मात्र प्रश्न साधा असो की,गंभीर कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचं काही पडलं नाही.यानं काय केलंय अन त्यानं काय केलंय असे प्रश्न परस्परांना विचारणाऱ्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी   मिळून कोकणाला खड्यात घातलंय.कोकणाचा कॅलिफोर्निया तर होणं नाहीच पण कोकणाचं कोकणीपण तरी हे राजकीय पक्ष टिकू देतील काय याबद्दल शंका आहे.पूर्वी रायगड हे भाताचं कोठार होतं.चांगल्या प्रतिचा तांदूल रायगडमधून बाहेर जायचा.आज ते बंद झालंय.जगातील प्रमुख तांदुळ निर्यातदार देशांपैकी भारत एक असल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या शरद पवारांनी रायगडातील तांदळाचं उत्पादन लक्षणियरित्या का घडलं यावर थोडं भाष्य केलं असतं आणि ते उत्पादन वाढविण्यासाठी एखादी योजना मांडली असती तर नक्कीच रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता .ते झालं नाही.त्यामुळं महाराष्टाचा कारभार चालविणाऱ्या या नेत्यांच्या सभेपासून किंवा त्यांच्या भाषणातून कोकणी माणसाला काहीच मिळालं नाही.आपण मोठी गर्दी कारायची  आणि नव नव्या शिव्यांचा साठा बरोबर घेऊन घरी परतायचं याशिवाय या सभांना आता काही अ र्थ उऱलेला नाही.कधी भावनिक अहंकार फुलवायचे,कधी इतिहासाचे दाखले देत मुळ विषयांपासून जनतेला दूर घेऊन जायचे,कधी स्मारकाच्या गोष्टी उकरून काढायच्या,तर कधी हा जातीयवादी किंवा तो नक्षलवादी म्हणत आपल्या पुरोगात्मीत्वाचे ढोल वाजवायचे असे प्रकार सुरू आहेत.कोण जातीयवादी आहेत,? कोणाला डावे म्हणायचे? ,कोण संधीसाधू आहे?  हेच आता जनतेला कळेनासे झाले आहे.साऱ्यांनी मिळून सामांन्य कोकणी माणसांची अवस्था भ्रमिष्टा सारखी करून टाकली आहे अशा मानसिक अवस्थेतच कोकणी माणूस कोणाच्या तरी नावापुढचं बटन दाबतो आणि पुढील पाच वेर्षे नशिबाला दोष देत बसतो.हे चित्र यावेळेसही बदलेल असं अजिबात वाटत नाही.

 एस.एम.देशमुख

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here