संतोष पवार पुणे २३-०१-२०१८
साप्ताहिक रणसंग्रामचे संपादक संतोष पवार यांच्यावर दोन दिवसांपुर्वी हल्ला झाला. चंदन नगर पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. अवैधकामाचा फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हा हल्ला केला गेला.
संतोष पेटे जीवती २४-०१-२०१८
जीवती येथील पुण्यनगरी दैनिकाचे वार्ताहार श्री संतोष पेटे यांच्यावर वाळू माफियाचा प्राणघातक हल्ला आठ ते दहा जणांनी मिळून शेणगाव रोडवर बोलेरो गाडीने पाठलाग करून हल्ला केला: वाळू डम्प केलेली फोटो काढायला गेले असल्याच्या कारनावरून हल्ला केला
कैलास चौधरी* उस्मानाबाद २८-०१-२०१८
हिप्परगा रवा येथे अवैध दारू विक्री विरोधात आंदोलन झाले होते. याची बातमी *BBC Marathi चे पत्रकार कैलास चौधरी* यांनी कव्हर केली होती. याचा राग धरुन आज *उस्मानाबाद येथे पत्रकार कैलास चौधरी* यांना त्यांच्या राहत्या घरी मारहाण करण्यात आली. *पत्रकार कैलास चौधरी* यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तकार केली असून, आता आरोपींकडून *पत्रकार चौधरी* यांच्या विरुद्धही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here