तीन पत्रकारांना अटक

0
756

पॅरिस : अल जझिरा या टीव्ही वाहिनीसाठी काम करणाऱ्या तीन पत्रकारांना एका बागेतून ड्रोन विमान उडवल्याच्या आरोपावरून शुक्रवारी अटक करण्यात आली. पहिला पत्रकार ड्रोन विमान चालवत होता, दुसरा त्याचे छायाचित्रण करत होता, तर तिसरा ते पाहात होता, असे सूत्रांकडून समजते. गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या वेळी ड्रोन विमाने उडताना दिसत आहेत. या घटनांचा अटक करण्यात आलेल्या पत्रकारांशी काही संबंध आहे किंवा नाही, याची माहिती समजू शकली नाही. पॅरिसमध्ये ड्रोन विमाने उडवण्यास कायद्याने बंदी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here