डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू

0
773

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जळगाव जिल्हयातील एका तरूण पत्रकाराचा मृत्यू झाल्याची अत्यंत ह्रदयद्रावक बातमी हाती आली आहे.

गणेश खांबेटे ( रा.अडावद ता.चोपडा) हे सकाळचे बातमीदार 1 मे रोजी जळगाव येथून पहाटे एका खासगी वाहनाने आपल्या अडावद गावी जाण्यासाठी निधाले होते. ते ज्या गाडीतून जात होते त्या गाडीला रस्तयात अपघात झाला.अपघातात त्यांच्या डोळ्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली.हाताचे हाड मोड्‌ल्यानं त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली.दरम्यानच्या काळात त्यांना अस्वस्थ वाटायला लागले त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले मात्र त्यांची प्राणज्योत मावळली.केवळ हातावरच्या उपचारामुळे मुलाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो ? असा सवाल खांबेटे यांच्या नातेवाईकांना केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार खांबेटे यांच्या वडिलांनी पोलिसात केली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. शवविच्छेदना धुळ्याला झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गणेश खांबाटे यांचा गेल्या फेब्रुवारीमध्येच विवाह झाला होता.सुखी संसाराची स्वप्न पाहण्यापुर्वीच ते सर्वांना सोडून गेले आहेत.
गणेश खांबेटे यांचा मृत्यू केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे त्यांच्या नातेवाईकाचें म्हणणे आहे,त्यामुळे या प्रकऱणाची सखोल चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here