‘डीजीआयपीआर’ची उपयुक्तता संपली..

0
768

‘डीजीआयपीआर’ची उपयुक्तता संपली..

सरकारचे कान आणि डोळे अशी कधी काळी माहिती आणि जनसंपर्क विभागाची प्रतिमा होती.माध्यमं आणि सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून हा विभाग सक्षमपणे काम करायचा,जनमानसात सरकारची चांगली प्रतिमा तयार करण्याबरोबरच शासकीय कामांची माहिती आम जनतेपर्यत पोहोचविण्याचे महत्वाचे काम हा विभाग करायचा.त्यामुळे प्रत्येक मुख्यमंत्री हट्टानं आणि जाणीवपूर्वक हा विभाग स्वतःकडे ठेवायचा.मात्र अलिकडे या विभागाची उपयुक्तता संपली आहे असं वारंवार जाणवायला लागले आहे.जवळपास बाराशे कर्मचार्‍यांचा स्टाफ आणि कोट्यवधींचं बजेट असलेल्या या विभागाची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आहे.कारण बहुतेक मंत्र्यांनी खासगी डीएलओ नियुक्त केलेले असल्याने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या े डीएलओंना कामंच शिल्लक राहिली नाहीत े.दुष्काळ, अतिवृष्टी किंवा अन्य महत्वाच्या प्रंसंगी मंत्र्यांना ताजी आणि सविस्तर माहिती देण्याचे काम हे सरकारी डीएलओ करायचे मात्र आज त्यांच्यावर कोणीही मंत्री विसंबून नाही.त्यांनी नियुक्त केलेले खासगी डीएलओ हे काम करताना दिसतात.शिवाय सरकारच्यादृष्टीनंही या विभागाचं महत्व आता उरलेले नाही.कारण मराठवाड्यासाठी असेलेले संचालक पद गेली पंधरा वर्षे भरलेले गेलेच नाही.ते कायम रिक्त असून कोणताही संचालक औरंगाबादला जायला तयार नाही. तीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातली.नागपूर कार्यालयातील संचालकपदही गेली पाच वर्षे भरले गेलेले नाही.याकडे कोणाचेच लक्ष नाही.अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकार्‍याच्या जागा देखील रिक्त आहेत.हा विभाग काळाच्या कित्येक वर्षे मागे असून माध्यमांच्या गरजा भागविण्यात हा विभाग पुर्णपणे अयशस्वी ठरलेला आहे असं मत एका माजी मुख्य सचिवांनी व्यक्त केलं आहे.

(टाइम्स ऑफ इंडियात दर सोमवारी प्रसिध्द होणार्‍या पब्लीक आय या प्रफुल्ल मारपकवार यांच्या लोकप्रिय कॉलमवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here