सोलापूर – महाराष्ट्र सरकार पत्रकारांना संरक्षण देण्यास उत्सुक नाही हे दिसून येत असल्यानं गुंड आणि समाजकंटक अधिकच मोकट सुटले असून ते आता पत्रकारांना भरचौकात उभे करून त्यंाच्यावर हल्ले करायला लागाले आहेत.
अशीच धक्कादायक घटना आज सोलापूर जिल्हयातील टेंभुर्णीत घडली.टेंभुर्णीचे एकमतचे वार्ताहर प्रवीण तुपसौंदर यांच्यावर आज गावातील एका जुगार किंगने भरचौकात हल्ला केला.या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून आरोपी फरारी आहेत.आरोपीवर कारवाई कऱण्याची मागणी टेंभुर्णीच्या पत्रकारांनी केली आहे.तुपसौंदर यांच्यावरील हल्लानं वर्षभरातील पत्रकारांवरील हल्ल्याची संख्या 72 झाली आहे तर फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा 22 वा हल्ला आहे.