टी व्ही -9 आणि एबीएन या वाहिन्या राज्याच्या विरोधात असल्याचे कारण देत या वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करून त्यावरं बंदी घालणाऱ्या तेलगणा सरकारने ही बंदी उठवावी यामागणीसाठी आज सकाळी हैदराबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शांततेच्या मार्गाने निदर्शनं कऱणाऱ्या टीव्ही-9च्या पत्रकारांना राज्य सरकारच्या पोलिसांच्या अरेरावीला सामोरं जावं लागलं.पोलिसांनी टीव्ही-9ची वाहनं फोडली,महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली,आणि थेट प्रक्षेपणही बंद पाडले.माध्यमांचा आवाज बंद पाडण्याच्या तेलंगणा सरकारच्या या कृत्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत असून या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून माध्यमांना त्यांची भूमिका निर्भयपणे पार पाडता येईल असे वातावरण स्थापित करावे अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.शांततेचय मार्गाने आपला निषेध नोंदविणाऱ्या महिला पत्रकारांना मारहाण करणे ही घटना निंदनीय असल्याचेही समितीने म्हटले आहे.