इंदर मल्होत्रा यांचे निधन*

0
1012

 

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार इंदर मल्होत्रा (८६) यांचे शनिवारी येथील इस्पितळात निधन झाले. ‘स्टेट्समन’, ‘टाइम्स आॅफ इंडिया’ यासारख्या वृत्तपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली होती.

‘युनायटेड प्रेस इंडिया’तून त्यांनी कारकिर्द सुरू केली होती. ब्रिटनमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘गार्डियन’ या प्रतिष्ठित दैनिकातही त्यांनी १९६५ ते १९९५ या काळात लेखन केले. ते १९८६-८७ मध्ये नेहरू फेलो आणि १९९२-९३ मध्ये वुड्रो विल्सन फेलोही होते. त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर लिहिलेल्या ग्रंथाचाही समावेश आहे.

पंतप्रधान पंडित नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ पाहिलेल्या निवडक पत्रकारांत त्यांचा समावेश होता. त्यांच्या पश्चात मुलगा अनिल (चित्रकार) आहे. त्यांची पत्नी रेखा मल्होत्रा यांचे २००७ मध्ये निधन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here