ज्येष्ट संपादक हंबीरे यांचे निधनN

0
650

ज्येष्ट संपादक हंबीरे यांचे निधनउस्मानाबाद दि ५

ज्येष्ठ पत्रकार व दैनिक संघर्षचे संपादक मालक व्यंकटेश हंबीरे (७५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले . पत्रकार , नाट्य कलावंत , राजकारणी असे बहु आयामी व्यक्तिमत्व असलेले ते आबा या नावाने सुपरिचित होते . पत्रकार घडवणारे संपादक अशी त्यांची ओळख होती .

त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 1 मुलगी 2 भाऊ 3 बहिणी नातवंडे असा परिवार आहे . मंगळवारी सकाळी 11 वाजता कपिलधार स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील . उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे व उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते . डॉ आंबेडकर साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता . समाजवादी पक्षाच्या विचारसरणीचे ते मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते म्हणून परिचीत होते . एस एम जोशी , जॉर्ज फर्नाडिस , मधू दंडवते , पन्नालाल सुराणा यांचे ते निकटवर्तीय सहकारी होते .

उस्मानाबाद जिल्हा विकासाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता ते नगर परिषदेचे सदस्यही होते . उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वृत्तपत्र चळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता .

डी फार्मेसी रेल्वे जिल्हा स्टेडियम आंदोलनात त्यांचे मोलाचे योगदान होते या आंदोलनात त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here