पत्रकार एक झाले तर असंही घडू शकतं…
एक प्रयोग जिंतूरच्या पत्रकारांचा …
एका तरूण पत्रकाराचं निधन होतं,स्वाभाविकपणे कुटुंब रस्त्यावर येतं.समाज हातवर करून मोकळा होतो.अशा वेळेस पत्रकार एकत्र येतात,मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला मदतीचा हात देतात त्यातून उभा राहतो एक गृह उद्योग.आज पत्रकाराचं कुटुंब स्वतःच्या पायावर उभं आहे.ही कथा आहे जिंतूरची.जिंतूरमधील तरूण पत्रकार संतोष स्वामी अल्पशा आजारानं सहा महिन्यापुर्वी मृत्यूमुखी पडले.दोन मुली,पत्नी कुणाचं छत्र नाही.कुटुंबासमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला.समाजानं हात झटकले होते आणि आप्तष्टही दिसेनासे झाले होते.अशा स्थितीत जिंतूरमधील प्रेस क्लब स्वामींच्या मदतीला धावून आले.80 हजाराच्या दोन मशिन प्रेस क्लबनं संतोषी स्वामी यांना घेऊन दिल्या.त्यातून स्वामी गृह उद्योग उभा राहिला आहे.संतोषी स्वामी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. या प्रकल्पाचं उद्घघाटन नुकतंच झालं..अशा पध्दतीचा हा प्रयोग मराठवाड्यातला पहिलाच प्रयोग असावा.जिंतूरनं एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.याच पध्दतीनं सार्याच पत्रकार संघटना काम करू लागल्या तर सरकारकडं चकरा मारायची गरज भासणार नाही.जिंतूरचा आदर्श सार्यांनीच घेतला पाहिजे.कारण किमान ग्रामीण भागात तरी आज पत्रकारांबरोबर ना समाज आहे,ना मालक आहेत ना, सरकार आहे.अशा स्थितीत आपल्यालाच एकमेकांना आधार द्यावा लागेल.हे काम जिंतूरच्या पत्रकार मित्रांनी केलंय त्यासर्वांना सलाम–
जिंतूर तालुका प्रेस क्लबनं जे उल्लेखनिय काम केलंय त्याबद्दल परिषदेच्यावतीने एप्रिलमध्ये नगरमध्ये होत असलेल्या अधिवेशनात जिंतूर प्रेस क्लबच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.