मुंबई- प्रत्येक बातमी देताना काळजी घेतली पाहिजे.विशेषतः निधनाचे वृत्त देताना तर ते हजारदा तपासले पाहिजे असं वृत्तपत्रविद्याभ्यास करणाऱ्या मुलांना बजावलं जातं.मात्र अनेकदा उपसंपादकांच्या डुलक्यांमुळे गोंधळ उडतात.ते कोणत्याही स्थितीत क्षम्य नसतंात .इलेक्टॉनिक मिडियात तर सातत्यानं असे गोंधळ होताना दिसत आहेत.घाईचं काम आहे,वेळेचं गणित असतं हे सारं ठीक असलं तरी स्मिता तळवळक र यांचं निधन झालेलं असताना ते स्मिता ठाकरेंचं निधन झालं असं दाखविणं वाहिन्यात कशी भरती आहे याच्यावर प्रकाश टाकणारं आहे. स्मिता तळवळकर समकालिन असल्या तरी मथळा देणाऱ्यास त्या जुन्या पिढीतील असाव्यात असंही वाटलं असावं, कदाचित स्मिता तळवळकर माहितच नसाव्यात.त्याला स्मिता ठाकरेंची माहिती असल्यानं त्यानं तसंच हेडिंग ठोकून दिलेलं दिसतंय.ज्यांच्याबद्दल अशी चुकीची बातमी दिली गेली त्यांच्या घरच्यावर काय परिणाम होतात याची जराही पर्वा सर्वात पुढेच्या स्पर्धा कऱणारे पाळत नाहीत हेही योग्य नाही.या चुकीची क्षमा मागितली जाईल ती मागितलीच पाहिजे पण पुन्हा अशी चूक होणार नाही याची ग्वाहीही जय महाराष्ट्रनं आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे.
‘स्मिता तळवलकर जुन्या पिढीतील अभिनेत्री’ हा उल्लेख योग्य नाही . वयाने त्या पुरत्या साठीच्याही नव्हत्या . समकालात नाट्य आणि चित्र अशा दोन्ही माध्यमात त्या सक्रीय होत्या , शिवाय सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर व्यापक असा होता म्हणजेच त्या प्रसिद्धीच्या कक्षेबाहेर किंवा विस्मृतीत गेलेल्या नव्हत्या …