“सत्ता आल्यावर माध्यमांना तुरूंगात डांबू” अशी धमकी देऊन झाल्यावर आणि त्यानंतर मिडियाने अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने वैतागलेल्या केजरीवाल यांनी आता जनतेलाच मिडियाच्या विरोधात भडकविण्यास सुरूवात केली आहे.
संगम विहार येथील एका जाहीर सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी जनतेला विचारले, “मी मोदींना एक पत्र लिहिले होते ते मिडिनाये दाखविले का ? मी ते पाहिले नाही तुम्ही पाहिले का ?”त्यावर सगळ्यांनी हात वर करून”नाही “असे म्हटले.त्यावर अरविंदजींनी माध्यमकर्मींकडे बघत “बघा जनता काय बोलते आहे ते”.. असे उद्गगार काढले. मिडियातील भ्रष्टाचााराचा विषय निघाल्यानंतर लोकांनीच केजरीवाल विरोधी मिडियाची नावं घ्यायला सुरूवात केली.झी आणि इंडिया न्यूजच्या नावानं बोंबा मारणं सुरू झालं. दीपक चौरसिया यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी सुरू झाली.ते पाहून केजरीवाल पुन्हा म्हणाले, “बघा मी हे बोलत नाही ,मी कुणाची नावही घेत नाही जनताच हे बोलत आहे” .ते पुढे म्हणाले, “मिडियाका यह असली रिपोर्ट कार्ड है”
मिडियाचं रिपोर्ट कार्ड मांडताना,जनता केजरीवाल यांच्या अंगावर शाई का ठाकतेय,त्यांना गुद्दे का मारले जातात यावर मात्र ते काही बोलत नाहीत.