महिला पत्रकारांवरील अत्याचाराच्या घटना थाबायला तयार नाहीत.ताजी घटना छत्तीसगडमधील रायपूरनजिक अकलतरा येथील आहे.अकलतरा येथील आमदाराच्या पुतण्यानं एका महिला पत्रकारावर 20 एप्रिल रोजी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.पत्रकार त़रूणीच्या घरच्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी पोलिसांकडं धाव घेतली.मात्र आरोपी आमदाराचा नातेवाईक असल्यानं त्यांनी नेहमीप्रमाणं गुन्हा दाखल करून घ्यायलाच टाळाटाऴ केली.मात्र माध्यमांचा दबाव वाढल्यानंतर सदरील आरोपीच्या विरोधात आयपीसी 456 आणि 376 अन्यये गुन्हा दाखल करून आरोपी करनसिंह सिसोदियाला अटक कऱण्यात आली असली तरी तो जेलमधून आपले फेसबुक अकाऊंट ऑपरेट करतोय .त्यामुळे त्याला जेलमध्ये सर्व सुविधा पुरविल्या जात असल्याच ंस्पष्ट दिसतंय.पत्रकार महिलेला पोलिस सहकाय4 करीत नाहीत असे दिसून आले आहे.त्यामुळे काल ही महिला रायपूरला आली होती.तिथं तिने काल वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याना निवेदन दिले आहे.आरोपीकडून सातत्यानं धमक्या येत असल्याचं पिडित महिलेचं म्हणणं आहे.
या घटनेचा छत्तीसगढ महिला प्रेस क्लब,छत्तीसगढ प्रेस क्लब इलेक्टॉनिक मिडिया असोसिएशनने निषेध केला आहे.महाराष्ट्र पत्रकार हमला विरोधी कृती समिती देखील या घटनेचा निषेध करीत आहे.

LEAVE A REPLY