चिरनेरच्या हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकऱण कऱणार 

0
944
उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाने निधी दिला नाही तरी आपल्या आमदार फंडातून तालुक्यातील सर्वत्र स्मारकांचे सुशोभिकऱण कऱण्यात येईल अशी घोषणा उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी केली आहे.
चिरनेर येथील हुतात्मा स्मारकाकडे होणारे दुर्लक्ष,आणि निधी अभावी स्मारकाची झालेली दुर्दशा यावर गेली दोन दिवस रायगडमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.या पार्श्‍वभूमीवर काल झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या 85 व्या स्मृतीदिनाच्या दिवशी मनोहर भोईर यांनी स्मारकासाठी पैश्याची अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी चिरनेर सत्यागृहातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.तसेच चिरनेर जंगल सत्यागृहावर चित्रपट काढला जात असून त्याच्या निर्माता आणि दिर्ग्दशकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here