मराठवाडा साथी हे मराठवाडयातील मान्यवर दैनिक.दिवाळी अंकही दर्जेदार असतो.या दिवाळी अंकाचं वैशिष्टये असं की,विविध क्षेत्रात कामं करणार्‍यां मराठवाडयातील एका भूमीपूत्रावर दरवर्षी  कव्हर स्टोरी केली जाते.यावर्षी मराठवाडा साथीनं मला त्या योग्य समजले आणि आपल्या अंकाच्या कव्हरवर मला ,पत्रकारांच्या चळवळीला स्थान दिले..पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेला लढा हा या स्टोरीचा मध्यबिंदू आहे.’एस.एम.देशमुख लढवय्या पत्रकार’ असा या कव्हर स्टोरीचा मथळा. मराठवाडा साथीचे मनापासून आभार  त्यांनी आपल्या चळवळीची दखल घेऊन ही स्टोरी केली.मला वाटतं हा चळवळीचा आणि मी ज्या मराठी पत्रकार परिषदेचं काम करतो त्या परिषदेचा बहुमान आहे.मराठवाडा साथीचे संपादक श्री.सतीश  बियाणी , कार्यकारी संपादक प्रशांत जोशी आणि मराठवाडा साथी परिवाराचा मी आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here