पंकजाताई मुंडे, एकनाथ शिंदे, जयदत्तआणणा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत वडवणीत पत्रकार
पुरस्कार वितरण सोहळा साजरा होणार

वडवणी : मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण रविवार दिनांक ९ जून रोजी दुपारी 2 वाजता बीड जिल्हयातील वडवणी येथे महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते होत आहेत.. या कायॅक़माचया अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख असणार आहेत.या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष युवा नेते अमोल दिनकरराव आंधळे आहेत..
नराठी पत्रकार परिषदेच्यावतीने ग्रामीण महाराष्ट्रात उल्लेखनिय कायॅ करणारया तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचा सन्मान केला जातो.. परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंत काणे आणि रंगाअण्णा वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यावर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाला जाहीर झाला आहे तर वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार करमाळा, वाडा, तळोदा, कागल, कळमनुरी, आष्टी, मालेगाव, चामोर्शी आदि तालुक्यांना जाहीर झाला आहे.. या जिल्हा आणि तालुका संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.. गेल्या वर्षी हा सोहळा पाटण येथे झाला होता.. यंदा वडवणीत हा सोहळा होत आहे.. ग्रामीण भागातच पुरस्कार वितरण सोहळे व्हावेत असा परिषदेचा प्रयत्न आहे..
वडवणी सारख्या ग्रामीण भागात प्रथमच एवढा भव्य दिव्य काय॓क़म होत असल्याने बीड जिल्हयात या काय॓कंमाबददल मोठी उत्सुकता आहे..या काय॓क़मास आ. आर. टी देशमुख, आ. सुरेश अण्णा धस, माजी आ. प़काश सोळुंके, केशवराव आंधळे, रमेश राव आडसकर, मोहनराव जगताप, विमल शिंदे, नगराध्यक्षा मंगलाताई मुंडे, श्रध्दा उजगरे, दिनकरराव आंधळे, वैशालीताई सावंत, विनायक बाप्पा मुळे, ह. भ. प. अण्णा महाराज दुटाळ, आदि उपस्थित राहणार आहेत..
दरम्यान सकाळी १० वाजता तालुका अध्यक्षांचा मेळावा होत असून मेळाव्याचे उद्घाटन सकाळ औरंगाबादचे कायॅकारी संपादक संजय वरकड आणि आज तकचे मुंबई संपादक साहिल जोशी यांच्या हस्ते होत आहे..
या काय॓क़मास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, काया॓धयक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, काया॓धयक्ष दत्तात्रय अंबेकर, सरचिटणीस विलास डोळसे, परिषद प़तिनिधी, विशाल सोळुंके, संयोजक वडवणी तालुका पत्रकार संघाचे जानकीराम उजगरे, अध्यक्ष बाबुराव जेधे, सचिव अविनाश मुलमुले,अधिस्वीकृती समितीचे अनिल वाघमारे यांनी केले आहे..
या काय॓क़मात परिषदेच्या सोशल मिडिया सेलची विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.. तसेच तालुक्यातील देवडी येथील नदीवर सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बंधारा बांधून देवडी गावचा दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणारे गावचे माजी सरपंच श्री. माणिकराव देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.. काय॓क़म यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा पत्रकार संघ, तसेच वडवणी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here