बीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.

0
2674

बीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.

वडवणी : बीड जिल्हा कात टाकतोय, बीड जिल्ह्यात ९ नवे महामार्ग तयार होत आहेत, बीड जिल्ह्यात रेल्वे येतेय, बीड जिल्हयातील मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढतो आहे.. अशा सकारात्मक बाबी पुण्या – मुंबईकरांपयॅनत पोहोचविलयाशिवाय नवे उद्योग बीडमध्ये येणार नाहीत आणि बीडच्या विकासाला खरया अथाॅनं गती येणार नाही…बीडमधील सकारात्मक गोष्टी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केलं आहे..
बीड जिल्हयातील वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आयोजित तालुका अध्यक्ष मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळयाचं उदघाटन करताना एस. एम. बोलत होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले, बीड म्हणजे मागास जिल्हा, बीड म्हणजे कायम दुष्काळी जिल्हा, बीड म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरयांचा जिल्हा, बीड म्हणजे ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा अशा नकारात्मक बाबींचाच सातत्यानं प़चार होत राहिल्याने मोठ्या उद्योगांनी बीडकडे पाठ फिरविली, त्यामुळे शेती हेच उपजिविकेचे साधन ठरले पण पावसाच्या कमतरतेमुळे शेती आतबटटयातला व्यवसाय ठरला.. परिणामतः बेकारी आणि शेतकरी आत्महत्या या आणि अश्याच प़शनांचा दुष्टचक्रात बीड जिल्हा अडकला.. लोकांचे प़शन वेशीवर टांगणं हे तर पत्रकारांचं कामच ते आपण प़ामाणिकपणे करतो देखील पण त्याच बरोबर सकारात्मक बाबींना प़सिधद देणं, जे चांगलं घडतंय ते जगासमोर मांडणं हे देखील पत्रकारांचं काम असल्यानं बीड जिल्ह्यात होत असलेली स्थित्यंतर लोकांसमोर आणल्यास त्याचा नक्कीच जिल्ह्यासाठी चांगला उपयोग होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
वडवणी येथे राज्यभरातील पत्रकारांनी यावं, एक दिवसासाठी का होईन दुष्काळाची अनुभूती घ्यावी आणि दुष्काळाची ही दाहकता माध्यमांनी जगाच्या वेशिवर टांगावी यासाठीच मुद्दाम बीड जिल्हयातील वडवणीत हा मेळावा घेतला.. येथून परत आपआपल्या भागात जाताना बीडचे प़शन आणि जिल्हयात होत असलेली सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरं याची नोंदही जिलहयाबाहेरून आलेल्या पत्रकारांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं..
पत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायदा हे दोन्ही विषय सरकारने प़लंबित ठेवल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला.. सरकार पत्रकारांच्या प़शनांकडं दुलॅक्ष करीत असल्याने येत्या १८ तारखेला प़तयेक तालुक्यात पत्रकार तहसिलदारांना निवेदन देऊन संताप व्यक्त करतील. तसेच मुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठविण्यात येणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..
परिषदेची चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी तालुका पत्रकार संघ अधिक मजबूत करण्यासाठी परिषद प़यतन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी नांदेड येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन होत असल्याची घोषणाही एस.एम.देशमुख यांनी केली.
परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्यास परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे, तसेच विभागीय सचिव, स्वागताध्यक्ष अमोलराजे आंधळे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विलास डोळसे, तालुकाध्यक्ष बाबुराव जेधे, जानकीराम उजगरे, अविनाश मुलमुले, अनिल वाघमारे तसेच पत्रकार मोठया संख्येनं उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here