मुंबईच्या जवळ असूनही गेली अनेक वर्षे अंधारात चाचपडणार्या घारापुरी किंवा एलिफन्टा बेटावर आता विजेचा लखलखाट होण्याची चिन्हे असल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.घारपुरी बेटावर राजबंदर,शेतबंदर आणि मिरा बंदर अशी तीन गावं असून या गावातून राहणाऱी जनता गेली अनेक वर्षे विजेसाठी प्रयत्न करीत आहे.मात्र आता त्याच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून 24 कोटी रूपयांचा घारपुरी वीज प्रकल्प मार्गी लागत आहे.यातील 20 कोटी रूपये एमएमआरडीए देणार असून उर्वरित 4 कोटी रूपये राज्य सरकार देणार आहे. न्हावाशेवा ते घारापुरी दरम्यान समुद्राच्या खालून अतिउच्च दाबाच्या तीन किलो मिटरच्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.परदेशी बनावटीच्या या केबल्स आयात करून येत्या दोन महिन्यात हे काम सुरू होईल अशी शक्यता आहे. मोरा बंदर ते भाऊचा धक्का दरम्यान स्पीड लाँच सेवा सुरू झाली आहे.त्याच्या उद्घघाटनाच्या वेळेस जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी मुख्यमंत्र्यासमोर घारपुरीच्या विजेचा प्रश्न मांडला आणि बेटावर वीज आली तर जागतिक कीर्तीच्या या पर्यटनस्थळाचा लौकीक आणकी वाढेल हे वास्तव त्यांच्या नजरेस आणून दिले.त्यानंतर उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडेही त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला त्यानंतर आता 24 कोटीच्या याा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात एलिफन्टा बेटावर विजेचा झगमगाट झालेला आपणास बघायला मिळणार आहे.