घाबरू नका,आम्ही पाठिशी आहोत

0
845

घाबरू नका,आम्ही पाठिशी आहोत
रायगड प्रेस क्लबचा दिलासादायक विश्वास

रायगड जिल्हयातील माणगाव येथील पत्रकार प्रकाश काटदरे यांचं नुकतंच अवेळी निधन झाले.एक मुलगी,आणि पत्नी मागे ठेऊन काटदरे गेले.तीन -चार वृत्तपत्रांकडून मिळणारं तुटपुंजे मानधन आणि एलआयसीच्या व्यवसायावर गुजराण करणाऱ्या काटदरे यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो.मुलगी तळकोकणातील एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतेय.आणि तसा कोणाचा आधार नाही.तिच्या शिक्षणाचं काय होणार सांगता येत नाही.
अशा स्थितीत रायगड प्रेस क्लबनं मदतीचा हात पुढे करायचा निर्णय़ घेतला आहे.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,कोकण विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे,माजी अध्यक्ष विजय पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार घेत 51 हजार रूपयांचा निधी जमविला आहे.तो आता सन्मानपूर्वक काटदरे कुटुंबाकडे पोहचविण्यात येणार आहे.मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी काही मदत करण्याची प्रेस क्लबची इच्छा आहे. 51 हजार रूपयांत काटदरे कुटुंबाचं आयुष्याचं गुजराण होणार नाही पण कोणी तरी आपल्या पाठीशी आहे हा विश्वास पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे ते काम रायगड प्रेस क्लबच्या हा मदत निधीनं केलं आहे.रायगड प्रेस क्लबनं असा एक मोठा मदतनिधी उभारून त्यातून गरजू पत्रकारांना मदत करण्याचाही स्वागतार्ह निर्णय़ घेतला आहे.त्याबद्दल रायगड प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद.
सरकारनं शकरराव चव्हाण पत्रकार कल्यणा निधी ( कल्याण ? डोंबल्याचं ) सुरू केला आहे.पण तिथंंंंंंंंंंं अट अशी आहे की,ती मदत केवळ अधिस्वीकृती पत्रकारांनाच मिळते.ही अट काढून टाकावी यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं प्रयत्न केलेत पण मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर बसलेले काही झारीतील शुक्राचार्य हे होऊ देत नाहीत.त्यामुळे गरजू पत्रकारांना ही मदत मिळतच नाही.नाशिकचे सुरेश अवधुत गेले,औरंगाबादचा रमेश राऊत गेेला,वाशिमच्या अन्य एका पत्रकाराचे निधन झाले,माणगावचे प्रकाश काटदरे गेले यापैकी कोणत्याही पत्रकारांच्या नातेवाईकांना सरकारची मदत मिळाली नाही.वस्तुतः सरकारच्या या निधीत लाखो रूपये पडलेले आहेत.एकीकडे ही रक्कम पडलीय आणि दुसरीकडे गरजू पत्रकारांना मदत मिळत नाही हा विरोधाभास संतापजनक आहे.या सर्व समस्या फडणवीस सरकारकंडं माडायच्या तर पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्याची भेटही मिळू दिली जात नाही.या सर्वाचा एकदिवस नक्कीच स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.असो ,
पत्रकार विरोधी सरकारवर जास्त अवलंबून न राहता रायगडच्या पत्रकारांनी एक चांगला आदर्श समोर ठेवला आहे.मला वाटतं,प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांनी आता आपसातील मतभेद बाजुला ठेवत जेव्हा कोणी अडचणीत असेल तेव्हा त्याला मदत केली पाहिजे.कारण कधी कोण अडचणीत येईल ते सांगता येणार नाही.वेळ कोणावरही येऊ शकते हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे.
रायगडचे चळवळे आणि अत्यंत प्रामाणिक पत्रकार प्रकाश काटदरे यांच्या कुटुबियांना कोणी मदत करू इच्छित असेल तर कृपया माजी अध्यक्ष विजय पवार (9222127456 )किवा अभय आपटे (9423882724) यांच्या मोबाईलवर संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here