घातक नायलॉन मांजा बाजारात 

0
1022
नायलॉन धाग्याच्या मांज्यावर बंदी असतानाही पनवेल परिसरात हा धागा विक्रीसाठी उपलब्ध असल्याने असा धागा विक्री करणार्‍यांवर  कारवाई करावी अशी मागणी पक्षीमित्र संघटनेनेन केली आहे.रायगड जिल्हयात मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात.पेण आणि अन्य ठिकाणी पतंगाच्या स्पर्धाही होतात त्यावेळी मांजा तुटून पतंग भरकटू नये यासाठी नायलॉनच्या धाग्यापासून बनविलेला मांजा वापरला जातो.हा मांजा पक्ष्यांच्या पंखात अडकून अनेक पक्षी मृत्यूमुखी
पडतात आणि मानवालाही त्याचा फटका बसतो हे वास्तव  समोर आल्यानंतर अशा मांजा विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे.तरीही हा मांजा अनेक ठिकाणी उपलब्ध होत आहे.दरम्यान घरावरून पतंग उडवित असताना काळजी घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here