एकीकडे गावितांनी आपली मुलगी हिना गावित हिला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. केद्रीय राज्यमंत्री सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले काँग्रेसच्या माणिकराव गावितांच्या एकहाती सत्तेला शह देण्यासाठी विजयकुमार गावितांनी शड्डू ठोकल्याचं दिसतं आहे. आपली मुलगी हिना गावित हिला भाजपची उमेदवारी देत माणिकराव गावितांविरोधात उतरवण्याची विजयकुमार गावितांची तयारी सुरु आहे. गावितांच्या या मनसुब्यांमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात मोठी नाराजी आहे.

त्यामुळं अखेर गावितांनी स्वतचंही वैद्यकीय शिक्षणमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. आता अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी आता काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.यांनी मात्र राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हटलं आहे. माझा शरद पवारांवर श्रद्धा आहे. त्यामुळं आपला राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं गावित म्हणाले. हिना गावितांना भाजपनं उमेदवारी दिल्यास तुमची भूमिका काय असेल असं विचारलं असता मात्र त्यांनी बोलणं टाळलं. 

LEAVE A REPLY