माहूर येथील पत्रकार नंदू संतान
यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

माहूर ः नांदेड जिल्हयातील माहूर येथील वरिष्ठ पत्रकार नंदू संतान यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा आज प्रयत्न झाला.
जातीचं खोटं प्रमाणपत्र दिल्यामुळं मारोती रेकूलवार याचं पद रद्द झालं आहे.त्यासंबंधीची बातमी आजच्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली.ही बातमी का दिली असा सवाल करीत लक्ष्मण बेहेरे यांनी नंदू संतान यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.याची तक्रार नंदू संतान यांनी माहूर पोलिसात दिली आहे.
तालुका पत्रकार संघानं या घटनेचा निषेध केला असून याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या जिजामाता चौक किनवट येथे बैठक बोलावली आहे.मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.हल्लेखोर लक्ष्मण बेहरे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY