मृत्यूनंतर काही जण स्वरसमा्ज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल गरळ ओकत आहेत..त्या गायीका म्हणून मोठ्या होत्या पण माणूस म्हणून त्या किती छोट्या होत्या हे सांगायला काहींनी सुरूवात केली.. काहींनी व्यावहारिक दृष्ट्या त्या किती कंजुष होत्या हे कथन सुरू केले.. इतरांनी त्यांच्या हिंदुत्ववादी, सावरकरवादी विचारसरणीवर आक्षेप घेतला.. एका पठ्टयानं तर शेतकरी आंदोलनास लता मंगेशकर यांनी पाठिंबा दिला नाही म्हणून जळजळ व्यक्त केली.. कोणी तरी म्हटलं की, त्यांनी नवीन गायकांना संधी मिळू दिली नाही..काहींनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला… इतरही अनेक आक्षेप घेतले गेले.. आपली मतं व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार कोणी नाकरत नाही.. मात्र लता मंगेशकर या भारतरत्न होत्या.. आपण त्यांच्या पासंगालाही पुरत नाही याचे वयवधानही पाळले जाऊ नये याचे आश्चर्य वाटते.. आक्षेप घेणारयांपैकी बहुतेकजण लता दिदींना कधी भेटले ही नसतील.. म्हणजे आक्षेप ऐकिव गोष्टीवर आधारित आहेत..

क्षणभर असं गृहित धरू की, सारे आक्षेप खरे आहेत.. पण या आक्षेपांना उत्तर द्यायला दिदी आहेत कुठे? मग कोणासाठी आपण हे सारं लिहितोय? मृत्यूनंतर वैर संपते असं म्हणतात पण काही आत्मे कायम द्वेष जपत असतात.. लता मंगेशकर काय? सचिन तेंडुलकर असू देत, अमिताभ असू देत, ट शाहरूख…नाही तर अण्णा हजारे.. त्यांचं महानपण कारण नसताना सहन न होणारे आत्मे आहेत.. शेतकरी आंदोलन हा लता मंगेशकर यांचा प्रांत आहे का? नक्कीच नाही.. मग आपण त्यांच्याकडून कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा कशी करू शकतो.. आजकाल काही मंडळी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देत असते.. त्यांना आपण तोंडाळ म्हणतो.. दिदींनी असंच व्हायला पाहिजे होतं का?

बाबांनो, थांबा रे… कंडू शमवायला इतर अनेक विषय आहेत.. एका पुण्यत्माबद्गल त्याच्या पश्चात जहरी टिका – टिप्पणी योग्य नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here