गरज आहे..मदतीची.. .

0
861

रायगडमधील एक धडाडीचे ,अत्यंत प्रामाणिक आणि चळवळे पत्रकार प्रकाश काटदरे यांंचं नुकतंच काविळीनं निधन झालं.घरात कमविणारं कोणी नाही.पत्नी,एक मुलगी एवढाच परिवार.मुलगी सिंधुदुर्गमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेते.प्रकाश काटदरे याच्या अचानक निधनानं घर कोलमडून पडलं.घरावर डोंगरच कोसळला. अशा स्थितीत काटदरे यांच्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं होतं.रायगड प्रेस क्लबनं आवाहन केलं आणि 51 हजार रूपयांचा निधी जमा झाला.ही रक्कम आता येत्या 23 तारखेला दुपारी 4 वाजता माणगाव येथे जाऊन काटदरे कुटुंबाला दिला जाणार आहे.यावेळी मी स्वतः उपस्थित राहणार आहे.51 हजार रू पयांची रक्कम फार मोठी नसली तरी यातून समाज आपल्या बरोबर आहे याची जाणीव काटदरे कुटुंबाच्या मनात निर्माण झाल्यास ती मोठी गोष्ट आहे.
काटदरे यांची मुलगी इंजिनिअरिंगच तिसऱ्या वर्षाला आहे.तिच्या शिक्षणासाठीही मदत होणं आवश्यक आहे.यासाठी कोणी दानशूर व्यक्ती पुढं आली तर मुलीचं शिक्षण निर्विध्न पार पडेल असं वाटतं.काटदरे यांच्या कुटुंबाला कोणी मदत देऊ इच्छित असेल तर त्यांनी अभय आपटे ( 9423382724 ) माजी अध्यक्ष किंवा संतोष पेरणे ( 8698904001 अध्यक्ष रायगड प्रेस क्लब यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.(SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here