गंगाखेड हे परभणी जिल्हयातलं तालुक्याचं ठिकाण.गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गंगाखेड  हे तालुक्याचं ठिकाण.चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या गंगाखेडचा विकास होणारच नाही याची पुरेपूर काळजी राजकीय मंडळींनी घेतलीय. . गंगाखेडला जे आमदार लाभले ते बाहेरचे.त्यामुळं गावच्या विकासाची जी आत्मीयता असते ती येथे दिसत नाही.नांदेड-पालमकडून येताना रेल्वे कॉ्रसिंगच्या पुलाचं काम गेली दोन-तीन वर्षे सुरूच आहे.ते किती दिवस चालेल याचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही.असं सांगितलं जातंय की,स्थानिक राजकारण्यांचा ”ससेमिरा चुकविण्यासाठी फ्लायओव्हरचा ठेका घेतलेला ठेकेदार गेली काही दिवस लापता आहे.अर्धवट कामामुळं कॉ्रसिंगवर किमान चाळीस – पन्नास मिनिटे  तरी ताडकळत थांबावं लागतं.दिवसभरात दहा-बारा गाडया तरी यामार्गावरून जा-ये करीत असतात.प्रत्येक वेळी एवढा वेळ घालवावाच  लागतो.परवा एका कार्यक्रमासाठी नांदेडहून गंगाखेडला येताना क्रॉसिंगवर जवळपास पन्नास मिनिटे थांबावं लागलं.संताप आला.बरं तेथून पुढं जावं तर ‘खड्यात राहणारं गाव’ असं गावाचं वर्णन करता येईल अशी स्थिती.कंबरा इतके खड्डे ते देखील न टाळता येणारे..एका मित्रानं सांगितलं की,गंगाखेडमध्ये गॅऱेजवाल्याचा धंदा तेजीत आहे.कारण रस्त्यांमुळं बहुतेक गाडयांची वाट लागलेली आहे.यावर कोणीच बोलत नाही.सत्ताधारी गप्प..विरोधकही दुर्लक्ष करताहेत.सार्‍यांना वेध लागलेत ते पुढील विधानसभेचे.जनतेच्या भोवती विविध प्रश्‍नांचा फास कायम राहिला पाहिजे असंच राजकारण्यांचं धोरण असतं.कारण खड्डे बजवू,आणि रस्ते चकाचक करू असे आश्‍वासन देत पुढील निवडणुका मग जिंकता येतात हा राजकीय लोकांचा अनुभव असतो.त्यामुळं कदाचित लोकसभेच्या तोंडावर या रस्त्यावर डांबर ओतलं जावू शकतं.रेल्वे क्रोससिंग ते परळी नाका  या दरम्यान गंगाखेडमध्ये नगरपालिका अस्तित्वात असल्याची कोणतंही चिन्हं दिसलं नाही.

गंगाखेड हे तसं आडमार्गावरचं गाव असलं तरी गंगेच्या काठावरचं हे गाव संत जनाबाईंची जन्मभूमी आहे.अनेक मंदिरंही गावात असल्यानं गावाला धार्मिक महत्व आहेच.त्यामुळं या ठिकाणी नेहमी वर्दळ असते.मात्र राजकीय साठमारीत अडकलेल्या या सुंदर गावाची अवस्था रया गेल्यासारखी झालीय.गावाला कोणीच वाली उरला नाही..याची खंत अनेकांनी बोलून दाखविली.मराठवाडयात अशी अनेक गावं आहेत.भलेही ती तालुक्याची ठिकाणं असतील पण त्या गावांना शहर म्हणण्याऐवजी मोठं खेडं म्हणणंच उचित ठरेल.गंगाखेड असेच. गंगाखेडच्या पत्रकारांनी या शहराच्या विकासात आता लक्ष घालावं अशी विनंती आहे .कारण मध्यंतरी गंगाखेडच्या पत्रकारांनी रस्त्यासाठी आंदोलन केलं,नांदेड-पनवेल या  सुपरफास्ट गाडीला गंगाखेडला थांबा मिळावा म्हणून आंदोलन केलं आणि आता केरळवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठीही गंगाखेडचे पत्रकार पुढं सरसावले.पत्रकारांनी गावात प्रभात फेरी काढली आणि काही लाख रूपये जमा केले.माझ्या हस्ते हा निधी सरकारी यंत्रणेकडं सुपूर्त केला गेला.शहरातील विविध पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते,पत्रकारांच्या प्रश्‍नांवर तर मी बोललोच मात्र शहरातील प्रश्‍नांच्या विरोधात पत्रकारांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून आपली भूमिका पार पाडावी असं आवाहनही मी केलं.अनेकांना वाटतं की,रस्तावर उतरून आंदोलनं करणं हे पत्रकारांचं काम नाही.मला असं वाटतं की,लेखणीच्या फटकार्‍यांनी सुस्त व्यवस्था जागी होत नसेल तर पत्रकारांनी प्रसंगी रस्त्यावर उतरूनही व्यवस्थेला आणि राजकारण्यांना वठणीवर आणण्याची भूमिका पार पाडली पाहिजे.रायगडच्या पत्रकारांनी रस्तावर उतरूनच मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मार्गी लावला.हा दाखला मी गंगाखेंडच्या मित्रांना दिला.गंगाखेडचे पत्रकार नक्की याचा विचार करतील असा विश्‍वास वाटतो.

पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन-तीन वेळा गंगाखेडला जाणं झालं.मराठवाडयात जे काही सक्रीय पत्रकार संघ आहेत त्यात गंगाखेड तालुका पत्रकार संघाचा उल्लेख करावा लागेल.पत्रकार संघाचे विविध उपक्रम सुरू असतात ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.येथेही पत्रकारांच्या दोन-तीन संघटना आहेत.हरकत नाही.पण ही मंडळी जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा विषय असतो तेव्हा एकजूट होते.एखादया पत्रकारांवर हल्ला झाला असेल,कोणी अडचणीत असेल तर गंगाखेडचे पत्रकार आपसातील संघटनात्मक मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येतात.हे अनेकदा दिसलं.परवा जवळपास तासभर गंगाखेडच्या पत्रकारांसमवेत होतो.मस्त गप्पा झाल्या.त्यामुळं नांदेड ते गंगाखेड या खड्डा मार्गावरील प्रवासाचा शीण नक्कीच कमी झाला.अध्यक्ष अजित स्वामी आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार ,त्यांनी आमचं जोरदार स्वागत केलं.

एस एम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here