खा,सुनील तटकरे,बाळासाहेब थोरात यांची
एस.एम.देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट


मुंबईः ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांनी आज रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली.ही भेट छान आणि सकारात्मक झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.यावेळी परिषदेचे विभागीय चिटणीस बापूसाहेब गोरे,कोकण विभागीय सचिव विजय मोकल, माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे,सचिव शशिकांत मोरे,उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,तसेच बी.एस.कुलकर्णी,देवा पेरवी,संतोष पाटील,प्रदीप मोकल,नरेश पवार,विनायक पाटील आदि पत्रकार होते.

काल मंत्रालयात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.बाळासाहेब थोरात यांचीही देशमुख यांनी भेट घेऊन त्यांना विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी पाठविण्याची मागणी केली.त्यावेळी देशमुख यांच्यासमवेत परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे माझ्या समवेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here