परिषदः जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी

मराठी पत्रकार परिषदेने राज्यात उभ्या केलेल्या पत्रकार चळवळीमुळं पत्रकार पेन्शन,पत्रकार संरक्षण कायदा हे प्रश्‍न तर मार्गी लागलेच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे चळवळीमुळे पत्रकारांमध्ये परस्पर आपुलकी,एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती निर्माण झाली.ही महत्वाची बाब आहे.जेव्हा जेव्हा परिषदेशी जोडला गेलेला राज्यातील कोणताही पत्रकार अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा पत्रकारांनी मदतीचा हात दिला.गेल्या तीन चार वर्षात असे शेकडो प्रसंग घडले आहेत.
ताजी घटना सांगली जिल्हयातील खानापूर तालुक्यातील..बाळासाहेब शिंदे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांना एकत्र आणत खानापूर तालुका पत्रकार संघाची स्थापना केली.त्यानंतर चार दिवसात ह्रदयविकाराने त्यांचे निधन झाले.आज 8 डिसेंबर रोजी या घटनेला वर्षे झाले.मात्र खानापूर तालुका पत्रकार संघाला याचा विसर पडला नाही.खानापूर तालुका पत्रकार संघाने शिंदे यांच्या दोन मुलींच्या नावे 60 हजार रूपयेे किंमतीच्या ठेव पावत्या आज शिंदे यांच्या पत्नी श्रीमती विमल शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या ..यावेळी दिलीप मोहिते,प्रसाद पिसाळ,प्रवीण धुमाळ,दिलीप कोळी,रामदास साळुंखे,प्रमोद रावळ,चंद्रकांत जाधव,भानुदास रास्ते,सचिन पोतदार ,लक्ष्मण पाटील,अजित जाधव आदि उपस्थित होते.मला वाटतं संघटनेचं हेच खरं काम आहे.
खानापूर तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकर्‍यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार…

LEAVE A REPLY