वरील छायाचित्रात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या समवेत असणारे आणि हुबेहुब त्यांच्यासारखेच दिसणारे आहेत आमचे मित्र पत्रकार राजेंद्र कापसे.राजेंद्र कापसे यांनी चष्मा घातला आणि चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वास आणला तर खरे अमित शहा कोणते हे कोणीही ओळखू शकणार नाही.अर्थात चेहरा तर सारखा आहे पण स्वभाव ? अमित शहांंच्या स्वभावाबद्दल ,त्यांच्या “अलौकिक कार्याबद्दल” आम्ही इथं बोलणार नाही.महाराष्ट्र टाइम्सच्या सोमवारच्या अंकात दिल्ली वार्तापत्रात त्याच्याबद्द्ल माहिती आलेली आहे.जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.मात्र आमचे मित्र राजेंद्र कापसे हे एक पामाणिक .पत्रकारितेवर नितांत निष्ठा असणारे पत्रकार आहेत हे आम्हाला नक्की माहिती आहे.मनमिळावू स्वभाव.गरजूंच्या मदतीला धा़वून जाण्याची वृत्ती मित्रांमध्ये रमणारा स्वभाव असणारे कापसे म्हणूनट मित्र परिवारात प्रिय आहेत.पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले कापसे चांगले संघटकही आहेत.शहरात त्यांनी पत्रकारांची एक चांगली फळी निर्माण केली आहे.सकाळच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो.सामाजिक जाणीव असणारा,एक जागरूक पत्रकार म्हणून राजेंद्र कापसे यांचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे.