मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मिडियाबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोण जगजाहीर आहे.त्यांनी पुन्हा एकदा त्याचं दर्शन घडवत पत्रकार ही जगातील सर्वात बेईमान जमात असल्याचं सर्टिफिकेट मिडियाला दिलं आहे.अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना केलेल्या भाषणाच्या वेळेस फारसे लोक नव्हते असं मिडियानं म्हटलं आहे.ते ट्रम्प यांना मान्य नाही.हा खोटेपणा आहे आणि या खोटेपणाची किंमत त्याना मोजावी लागेल अशी धमकीही त्यानी दिली आहे.मिडियाला व्हिलच्या रूपात पाहणारे ट्रम्प हे काही पहिले आणि एकमेव राजकारणी नाहीत.भारतात अशी ट्रम्पची मोठी संख्या आहे.स्वतः पंतप्रधान मिडियापासून अंतर ठेऊन असतात.पंतप्रधान झाल्यानंतर एकतर्फी ते मन की बात तर बोलतात पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेऊन असतात.भारतीय मिडियाला वेश्येची उपमा देणार्‍यांची संख्याही वाढते आहे.मंत्रालयात आता मंत्रीही पत्रकारांना टाळायला लागले आहेत.भारतात आणि अमेरिकेतही सत्ताधारी आता मिडियाला विरोधी पक्ष किंवा विरोधकांचे हस्तक समजायला लागले आहेत.मिडियावरील हल्ले,मिडियाला शिव्या देण्याचं जे प्रमाण वाढलंय ते नेत्यांचं मिडियावरील अवलंबित्व कमी झालंय,सोशल मिडियाचा ही मंडळी प्रभावीपणे वापर करायला लागल्याने मिडियाची उपयुक्तता संपली असंही त्यांना वाटायला लागलं आहे.त्यामुळं अनेक जन मिडियापासून स्वतःला चार हात दूर ठेवायला लागला आहे.अशा स्थितीत मिडियाला आणि पत्रकारालाही बाईट पत्रकारितेच्या जाग्यावर विषय तज्ज्ञ व्हावे लागेल.शिवाय मिडियाला व्हिलन ठरविण्याच्या या काळात पत्रकारांना ऑन दी स्पॉट रिपोर्टिंगवर भर द्यावा लागेल.सिटीझन जर्नालिस्ट जेथे पोहचत नाही तेथे मिडियाला पोहोचावे लागेल आणि आपली उपयुक्तता सिध्द करावी लागेल.मिडिया व्हिलन नाही तर खर्‍या अर्थानं हिरो आहे हे सिध्द कऱण्यासाठी मिडियाला मोठे कष्ट करावे लागणार आहेत हे नक्की..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here