संपादकांचा मजकुर ऑनलाईनवरून काढून टाकण्यास भाग पाडणे,पत्रकारांवर शंभर कोटीचे खटले दाखल करून त्यांचे नाक दाबण्याचा प्रयत्न करणे असे फंडे आजमावले जात असतानाच आता वरिष्ठ पत्रकारांवर गुन्हे दाखल करून त्यांची पूर्ण नाकेबंदी करण्याचे प्रयत्न देशातील विविध भागात सुरू आहेत.महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात जवळपास 24 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झालेले असतानाच बीबीसीचे माजी प्रतिनिधी आणि अमर उजाला डिजिटल इडिशनचे संपादक राहिलेले आहेत.एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य राहिलेल्या पत्रकार विनोद वर्मा यांना खंडणी आणि धमक्या दिल्याच्या आरोपावरून आज पहाटे दिल्लीतून उचलण्यात आले आहे.आज दुपारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.उत्तर प्रदेश सरकारने जे ट्टिट केले आहे त्यानुसार छत्तीसगढच्या रायपूर जिल्हयातील पंडरी ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी आणि धमकी प्रकरणातील एका गुन्हयानुसार ही अटक केली गेली आहे.कलम 384 ( खंडणी) आणि 506 ( जिवे मारण्याची धमकी) नुसार हे गुन्हे दाखल आहेत.
मामला एका सीडीचा आहे.छत्तीसगढ मधील एका मंत्र्याच्या सेक्स सिडीचे प्रकरण ते उजेडात आणणार होते असे सांगितले जात आहे.छत्तीसगढ प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भूपेष बघेल हे पत्रकार विनोद वर्माचे नातेवाईक आहेत.हा संदर्भ ही सारी कारवाई का झाली हे दाखविण्यासाठी पुरेसा आहे.भूपेष बघेल म्हणाले,सरकार विनोद वर्मावर नाराज होती.केवळ पत्रकारांच्या मनात दहशत बसविण्यासाठी ही अटक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पत्रकार संघटनांनी देखील या अटकेचा निषेध केला असून पत्रकरांचा आवाज बंद कऱण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पत्रकारांवर हल्ले कऱणे किंवा अन्य गोष्टींपेक्षा पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कऱणे हा पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा सर्वात जालिम उपाय आहे.त्यामुळं समाज आणि पत्रकार संघटना उघडपणे संबंधित पत्रकाराच्या पाठिशी उभ्या राहत नाहीत,समाजात पत्रकाराची प्रतिमा मलिन होते आणि पोलिस ठाण्याची हवा खाऊन आलेल्या पत्रकाराचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्याचआ आवाज आपोआप बंद होतो.अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झालेले अनेक पत्रकार आयुष्यातून उठले आङेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here