कोकण रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प

0
755

वीर आणि करंजाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे आठ डबे घसरले आहे. रुळावरुन हे डबे घसरल्यानं कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे.

यामुळं सध्या दादर पॅसेंजर भोके स्थानकात अडकली आहे. तर मंगला एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात अडकली आहे. कोईमतूर-बिकानेर कणकवली थांबली असून केरळा संपर्क क्रांती एक्सप्रेस अडवली स्थानकात थांबवण्यात आली आहे. नेत्रावती एक्सप्रेस देखील सिंधुदुर्गात अडकल्यानं सर्वच प्रवाश्यांचा खोळंबा झाला आहे.लोकमान्य िटळक टमिर्नेस ते गोव्याकडं आणि गोव्याकडून मुंबईकडं येणारी अप अॅन्ड डाऊन डबलडेकर थांबविण्यात आली आहे.तसेच जनशदाब्दी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.विशेष शताह्दी एस्क्प्रसेही रद्द करण्यात आली आहे.
आधीच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना गावात पोहचण्याची आस लागली आहे. रेल्वे प्रशासनानं या काळात कोकणातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली आहे. पण त्यात हा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.
रेल्वे व्यवस्था ठप्प झाल्यानं आता रस्ते वाहतुकीवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वीच कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची अडचण झाल्याचं चित्र आहे. आता हे विघ्न कधी दूर होतं याचीच प्रतीक्षा कोकणवासिय व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here