तब्बल २७ तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू करण्यात कोकण रेल्वेला अखेर यश आले आहे.काल सकाळी साडेसहाच्या सुमारासा कोकण रेल्वे मागार्वर वीर ते करंजडी स्थानका दरम्यान मालगाडीचे सात डबे रूळावरून धसरल्याने कोकण रेल्वे टफ्प झाली होती.रेल्वे वाहतूक पूवर्पदावर यावी यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले जात होते तरीही पाऊस आणि चिखलात रूतलेल्या डब्यांमुळे कामात व्यत्यय येत होता.अखेर आज सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे मागार्वरील अडथळा दूर कऱण्यात कोकण रेल्वेला यश मिळाले आहे.त्यानंतर या मागार्ची चाचणी घेतली गेली.ती यशस्वी झाल्यानंतर या मागार्वरून काही वेळात भावनगरी-कोचिवली ही रेल्वे रवाना होईल अशी माहिती मिळाली आहे.
कोकण रेल्वेला एेन सनासुदीच्या दिवसात खोळंबा झाल्याने काल प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले.आता कोकण रेल्वे पुवर्पदावर येत असल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY