कोकणातील पत्रकार उद्या पुन्हा रस्त्यावर उतरताहेत..

0
813

रायगडमधील पत्रकार उद्या मंगळवारी वडखळ ते पेण असा लाॅंगमार्च  काढताहेत .सकाळी ११ वाजता वडखळहून शेकडो पत्रकार हातात काळे झेंडे घेऊन पेणच्या दिशेनं कुच करतील.यामध्ये अनेक सामाजिक संघटना,रिक्षा संघटना आणि नागरिक सहभागी होतायेत .”मुंबई-गोवा महामागार्चं चौपदरीकरण करावं” ही पत्रकारांची मागणीय .त्यासाठी सतत २००८ पासून हे आंदोलन सुरूय.आरंभी पत्रकाराच्या मागणीकडं दुलर्क्ष करणाऱ्या सरकारनं अखेर २०१२म

ध्ये रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.इंदापूर ते पळस्पे या ८४ किलो मिटरच्या टप्प्याचं काम सुरूही झालं.पण मध्येच माशी शिंकली.जेमतेम ३० टक्के काम झालं आणि नवं सरकार राज्यात येताच काम ठप्प झालं.मग पुन्हा पत्रकारांना आदोलन करावं लागतंय.रस्तावर माणसं मरत आहेत,कोकणातील राजकारणी,सामाजिक कायर्केतर् त्याकडं बघत नव्हते,नाहीत.त्यामुळं हा विषय पत्रकारांनी  हाती घेतला.लोकांनी त्याचं स्वागत केलं.मुंबई-गोवा महामागर्चा विषय केवळ अपघातापुरताच मयार्दित नाही तर हा महामार्ग  कोकणच्या विकासाचा महामार्ग  ठरणार आहे.त्यासाठी देखील  लेखणीची ही रस्त्यावर उतरून लढाई आहे .

निलेश राणे परवा रायगडात होते.मुंबई गोवा महामागार्वर गेल्या पाच वषार्त २९८३ अपघात झाले आणि त्यात ६८५ जणांना आपला जीव गमवावा लागला.२५८३ गंभीर जखमी झाल्याची आकडेवारी त्यांनी  दिली.महामागार्साठी आपण आक्रमक होणार असल्याची भीमगजर्नाही त्यांनी केली.आमचा ऊर भरून आला.सत्ता गेल्यानंतर तरी कोकणच्या अनेक भाग्यविधात्यापैकी एकाला तरी कोकणच्या रस्त्याची याद आली.२००८ पासून पत्रकार लढत होते,तेव्हा सारेच मुग गिळून होते.कोणी चकारशब्दही बोलत नव्हते.जे बोलत होते ते म्हणत होते “या महामागार्चं रूंदीकरण करण्याएेवजी रेवस -रेड्डी सागरी मार्ग च झाला पाहिजे”.विषयांतर करण्याचा हा प्रयत्न होता.सारेच गप्पगार होते आणि अपघात थांबत नव्हते .दररोज सरासरी दोन बळी जात होते.महिन्याला पन्नास-साठ लोकांच्या रक्ताचा रस्त्यावर होणाऱा अभिषेक,त्याचे फोटो आणि बातम्या छापताना होणारी मनाची कालवाकालव जास्त काळ सहन होणं शक्य नव्हतं.त्यातून हे आंदोलन उभं राहिलं.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची तुलना नाही मात्र पत्रकारांनी एखादा विषय हाती घेतला आणि त्याचा पत्रकारांनी  सलग सात वर्ष  पाठपुरावा केल्याचे राज्यात तरी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंंतरचं दुसरं उदाहरण नाही.त्यामुळं टीका कऱणारांची काळजी नाही.टीका करणारे दोन्ही बाजुंनी बोलतात.”रस्तायवर अपघात होतात पत्रकारांना दिसत नाहीत काय असंही म्हणतात . आणि अपघात होताना दिसले तर हे पत्रकाराचं काम आहे काय असंही म्हणतात .पत्रकारांसाठी आम्ही हल्ला विरोधी कायदा मागतो आहोत,पेन्शन मागतो आहोत,गरजू पत्रकारांना मदत दिली जावी अशी मागणी करतो आहोत तर मजिठियाबाबत यांची दातखिळ बसलीय काय? असाही सूर काढता येतो.अथार्त जे काही करतात त्यांनाच लोक सूचना करतात.काहीच न करणाऱ्यांना तुम्ही हे का करीत नाहीत किंवा हे तुमचे काम नाही असं कोणी बोलत नाही.अशा सूचनावीरांच्या सूचनांचं आम्ही नेहमीच स्वागत करतो.कारण आम्ही व्यक्तिगत मतांपेक्षा सामुहिक विचारांना महत्व देत आलो आहोत .

उद्या आमचा लाॅंगमाचर् आहे.कोकणात पाऊस जोरात सुरूय.तरीही आंदोलन होणारंय.मी आहेच.संतोष पवार,संतोष पेरणे,मिलिंद अष्टीवकर,नागेश कुलकणीर्,देवा पेरवी,विजय पवार,अभय आपटे हे सारे सामाजिक बांधिलकी जपणारे, तरुण -तडफदार पत्रकार आदंलनाचं नेतृत्व कऱणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईकही येणार आहेत.ज्यांना वाटतं,कोणताही दोष नसताना रस्तायवर जाणारे बळी थांबावेत,कोकणचा विकास व्हावा अशा सवार्नी आंदोलनात सहभागी व्हावं .विनंती करीत नाही कारण हे कोकणच्या हिताचं आंदोलन आहे.विनंती सरकारलाय,कोकणी जनतेचा आता जास्त अंत पाहू नका.ठोस निणर्य ध्या,तशी कृती करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here