आम्ही रस्त्यावर उतरतो आहोत..तुम्हीही या..

0
1242
आम्ही रस्त्यावर उतरतो आहोत..तुम्हीही या..
 
हातात लेखणी असताना लोकहिताच्या प्रश्‍नासाठी पत्रकारांनी रस्त्यावर उतरण्याची गरज काय ? असा प्रश्‍न कोकणातील पत्रकारांना 2008 पासून विचारला जातोय.मात्र या प्रश्‍नाकडं दुर्लक्ष करीत कोकणातील पत्रकारांनी प्रसंगी पत्रकारांना रस्त्यावर उतरावेच लागते कृतीतून दाखवून दिलंय.सलग चार वर्षे आोंदलन केल्यानंतर मुबंई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं मात्र आता हे काम पुन्हा रखंडलं आहे.एवढेच नव्हे तर या रस्त्याची चाळण झाली आहे.त्यासाठी पुन्हा एकदा पत्रकारांना रस्त्यावर उतऱण्याची गरज निर्माण झाली आहे.
आम्ही रस्त्यावर उतरत आहोत तुम्हीही या..

*चलो वडखळ चलो वडखळ*

*मानवी साखळी* व *पोस्टर प्रदर्शन* करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी

नमस्कार मित्रांनो,

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदारीकर याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपले मार्गदर्शक *मा. एस.एम. देशमुख साहेब* यांच्या नेतृत्वाखाली *मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2017* रोजी 11वाजता *वडखळ येथे मानवी साखळीद्वारे रस्त्यावरील खड्ड्यांचे पोस्टर प्रदर्शन करून शासनाचे लक्ष वेधून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.*

या आंदोलनात *मा. एस एम देशमुख साहेब* हजर राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून हे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
तरी *रायगड प्रेस क्लब*च्या कार्यकारिणी सदस्यांसह प्रत्येक तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, व सदस्यांनी 5 डिसेंबर रोजी 10 वाजता वडखळ येथे उपस्थित रहावे ही विनंती.

विजय मोकल
अध्यक्ष
*रायगड प्रेस क्लब*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here