महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आणि दै. ‘श्रमिक एकजूट’ (नांदेड)चे संपादक कृष्णा शेवडीकर यांची तर कार्यकारी मंडळावर ‘पुण्यनगरी’चे संपादक संजय मलमे यांची निवड करण्यात आली. श्री शेवडीकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक लोकाभिमुख पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ही निवड कार्यकारी मंडळाने केली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष यशवंत पाध्ये यांनी जाहीर केले. कार्यकारी मंडळातील अन्य पदाधिकार्यां मध्ये उपाध्यक्षपदी प्रकाश कुलथे (श्रीरामपूर) आणि गजानन चव्हाण (मुंबई) तसेच सचिवपदावर एकनाथ बिरवटकर (ठाणे) आणि कोषाध्यक्षपदी सौ. शारदादेवी चव्हाण (संगमनेर) यांची निवड यापूर्वीच करण्यात आली असून कार्यकारी सदस्यांमध्ये रमेश खोत (जालना), डी.एन.शिंदे (मुंबई), श्री वंदन पोतनीस (नाशिक), योगेश जाधव (कोल्हापूर), श्री सुधीर जाधव व श्री बाळकृष्ण साळुंखे (मुंबई) यांचा
समावेश आहे. कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री कृष्णा शेवडीकर यांनी श्री. यशवंत पाध्ये यांच्या सक्षम नेतृत्वाखाली परिषदेने चालविलेले कार्य
या पुढील काळात अधिक गतीमान करण्याचा माझा सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न राहील असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
अभिनंदनासाठी ९४२२१७२०२७