जम्मू-काश्मीरमध्ये 14 जून 2018 रोजी रायझिंग काश्मीर दैनिकाचे संपादक शूजत बुखारी यांची निर्घृण हत्त्या केली गेली.मात्र ते काश्मीर खोर्‍यात हत्त्या झालेले ते पहिलेच संपादक-पत्रकार नाहीत.चौथ्या स्तंभावर येथे यापुर्वी देखील वार झालेले आहेत.यातील प्रमुख घटनांची माहिती

1) लासा कौल ः 13 फेब्रुवारी 1990 

दूरदर्शन केंद्रेच संचालक असलेल्या लासा यांच्ीी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्त्या केली गेली.

2) गुलाम महंमद लोणेः 29 ऑगस्ट 1994

ग्रटर काश्मीरसाठी लिखाण करणार्‍या गुलाम महंमद यांची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्त्तया केली गेली.

3) मुस्ताक अलीः 10 सप्टेंबर 1995

एएफपीचे छायाचित्रकार आणि एएनआयचे कॅमेरामन मुस्ताक अलीची बॉम्ब स्फोटात हत्त्या केली गेली.

4)  गुलाम रसूल शेखः 10 एप्रिल 1996

रेहनुमा ए काश्मीर या उर्दु दैनिकाचे संपादक असलेले शेख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह नदीत टाकला गेला.

5) अल्ताफ अहमद फाक्टो- 1 जानेवारी 1997

अल्ताफ हे दूरदर्शनचे अँकर आणि िट्रिंजर होते.त्यांची गोळ्या झाडून हत्त्या केली गेली.दहशतवादी चळवळीच्या विरोधात सातत्यानं आवाज उठविणार्‍या अल्ताफ यांना सातत्यानं धमक्या येत होत्या.नंतर अलगाववाद्यांनी त्यांची हत्त्या केली.

6) सैदान शफी ः 16 मार्च 1997 

दूरदर्शनचे रिपोर्टर शफी यांची श्रीनगरमध्ये हत्त्या केली गेली.काश्मीरमधील अलगवतावाद्यांच्या विरोधात ते एक कार्यक्रम सादर करीत होते.ते दहशतवाद्यांना मान्य नव्हते.

7) प्रदीप भाटियाः 10 ऑगस्ट 2000

हिंदुस्थान टाइम्सचे प्रतिनिधी यांची बॉम्ब स्फोटात हत्त्या केली गेली.त्यांच्याबरोबर अन्य 11 जण या स्फोटात ठार झाले.त्यात 6 पत्रकार होते.या स्फोटाची नंतर हिजबुल मुजाहिद्दीन या दङशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली.

8) परवेझ महंमद सुलतान ः 31 जानेवारी 2003

न्यूज अ‍ॅन्ड फिचर अलायन्सचे संपादक असलेल्या परवेझ सुलतान यांची एका अज्ञात तरूणानं केलेल्या गोळीबारात हत्त्या केली गेली.

9)आशिया जिलानी ः 20 मे 2004

दहशतवाद्यांनी महिला पत्रकारांनाही सोडले नाही.फ्रिलान्स जर्नालिस्ट असलेल्या आशिया सातत्यानं मानवी हक्काचे विषय घेऊन लिखाण करीत होत्या.लॅन्ड माइनच्या स्फोटात त्यांची हत्त्या करण्यात आली.

10) अशोक सोधी ः 11 मे 2008

दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात सुरू असलेल्या गोळीबारीचे छायांकन करताना अशोक सोधी यांचा बळी गेला.

11) जावेद अहमद मीरः 13 ऑगस्ट 2008

श्रीनगरमधील एक आंदोलन कव्हर करताना गोळी लागून जावेद यांची मृत्यू झाला.चॅनल 9साठी काम करणारे मीर आपल्या चॅनलच्या अन्य सहकार्‍यांची प्रतिक्षा करीत असताना त्यांना गोळी लागली आणि ते ठार झाले.

12) शूजत बुखारी _14 जून 2018 

सांयकाळच्या सुमारास श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता. बुखारी यांची धाडसी पत्रकार म्हणून ओळख होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here