Thursday, April 22, 2021

काय असेल माझ्या अध्यक्षीय भाषणात 

काय असेल माझ्या अध्यक्षीय भाषणात .

 मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषणाबद्दल उपस्थित पत्रकारांना मोठीच उत्सुकता असते.माध्यमांना भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर अध्यक्षांची मतं ,भूमिका जाणून घेण्यासाठी उपस्थित पत्रकार उत्सुक असतात.अध्यक्षीय भाषणात मराठी पत्रकार परिषद पुढे कशी वाटचाल करणार हे स्पष्ट केलेलंं असतंच त्याचबरोबर एकूणच माध्यम जगतातील समस्यांना कसं  भिडायचं यावरही भाषणात चर्चा केलेली असते.आज माध्यमांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.मुळात केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण भांडवलदारी माध्यम समुहाची तळी उचलून धरणारे आणि त्याचबरोबर छोटया वृत्तपत्रांची गळचेपी कऱणारे आहे.त्यामुळं जिल्हा स्तरीय वृत्तपत्रांसमोर आपल्या अस्तित्वाचा मोठाच प्रश्‍न निर्माण झालेला आहे.माध्यमांत मुठभर भांडवलदारांची एकाधिकारशाही येऊ घातली असल्याने चौथ्या स्तभासमोरच नव्हे तर एकूणच लोकशाही  व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ घातले आहेत.देशातील जे पाच-पंचेवीस भांडवलदारी माध्यम समुह आहेत त्यांच्या ताब्यात आजच सारा मिडिया एकवटत चालला आहे.पुढील काळात ही प्रक्रिया अधिक गतीमान होणार असल्याने छोटयांसमोर अस्तित्वांचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.एकाधिकारशाहीमुळे अरेरावी वाढत जाते.तसं इकडंही होताना दिसत आहे.सर्वोच्च न्यायालायने आदेश देऊनही जर भाडवलदारी वृत्तपत्रे मजेठियाची अंमलबजावणी करीत नसतील आणि सरकारही त्यांना दमात घेऊन ती करायला भाग पाडत नसेल तर सरकार आणि भांडवलदार यांच्यात नक्कीच मांडवली झाली आहे असे म्हणता येते.एकीकडे छोटया वृत्तपत्रांना मोडीत काढायचे आणि दुसरीकडे श्रमिक पत्रकारांना वेठबिगारासारखे वागवायचे धोरण पुढील काळात माध्यम क्षेत्रातील असंतोषाला पूरक ठरणार आहे.
आज माध्यमातील एकही घटक समाधानी नाही.समाजाला  जाणीव नाही किंबहुना पत्रकारांचे काही प्रश्‍न आहेत हेच समाज मान्य करायला तयार नाही.मात्र दुसरीकडे समाज आणि सरकारच्या पत्रकारांकडून ढीगभर अपेक्षा असतात.पत्रकारांनी कसे वागावे हे सांगताना टिळक-आगरकरांचे हवाले दिले जातात.पत्रकारांनी निस्पृहपणे आपले कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा करणारा समाज पत्रकारांसाठी काहीच करीत नाही.गेल्या दहा वर्षात एक हजारांवर पत्रकारांवर हल्ले झाले, समाजातील एकाही घटकाने कधी निषेधाचं साधं पत्रक काढलं नाही.निष्ठेनें पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार आज विविध समस्याने जर्जर झाले आहेत.अनेकांकडं दुपारच्या डायबेटीसच्या गोळ्या खायलाही पैसे नाहीत.समाज त्यांच्यासाठी काहीच करीत नाही आणि सरकारला फुरसत नाही.त्यामुळं मोठी अस्वस्थतः माध्यमात आहे.साध्या वार्ताहरापासून वितरकांपर्यंत प्रत्येक घटकांचे प्रश्‍न आहेत त्यामुळे त्यामुळं प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत मोठी नाराजी आहे..माझ्या भाषणात या सार्‍या गोष्टींचा उहापोह मी केलेला आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कायदा सरकारनं केला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतानाच हा कायदा दात नसलेला आहे असा आरोप कऱणार्‍यांचे दात घश्यात घालण्याचा प्रयत्नही मी केलेला आहे.माध्यमांसमोर असलेल्या इतरही प्रश्‍नांची चर्चा केलेली आहे आणि मराठी पत्रकार परिषदेची पुढील दिशा कशी असेल किंवा असावी यावरही  मत मांडलेले  आहे.भाषणात सर्व मुद्यांना मी स्पर्श कऱण्याचा प्रयत्न केला आहे.पत्रकार माझ्या भाषणाचं स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
मी भाषण उत्स्फुर्त करणार आहे.मात्र छापील भाषण सर्व सदस्यांना दिले जाणार आहे.हे छापील भाषण आजच मला मिळाले आहे.उद्या मी शेगावकडे रवाना होत आहे.

..

Related Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,849FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...
error: Content is protected !!