हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांचा तपास लावण्यात अद्यापही कळमनुरी पोलिसांना यश आलेलं नाही.चार आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेलेे होते मात्र त्यातून काही निष्णण्ण झालं नाही.त्यामुळं हिंगोली जिल्हयातील पत्रकारांमध्ये मोठी नाराजी आङे.पोलिसांच्या या निष्क्रियेचा निषेध करण्यासाठी कळमनुरी येथे पत्रकारांनी आज धरणे आंदोलन करून तहसिलदारांना निवेदन दिले.तसेच येत्या पंधरा दिवसात जर पोलिसांनी आरोपींना पकडले नाही तर एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडयातील पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान तोष्णीवाल यांची प्रकृत्ती आता उत्तम असून ते घरी आले आहेत.राजकीय हेवेदाव्यातून हा हल्ला झाला होता,हल्लेखोरांचा मला ठार करण्याचाच इरादा होता असे तोष्णीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
कळमनुरीत पत्रकारांची धरणे
