कर्जत परिसरात 157 कुपोषित बालके

  0
  663

  रायगड जिल्हयात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कुपोषित बालकांची संख्या घटली तरी आजही कर्जत परिसरात 157 कुपोषित बालके असल्याचे वास्तव सर्वेतून समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.जुलै 2015 मध्ये कऱण्यात आलेल्या सर्वेनुसार कर्जत परिसरात 530 कुपोषित बालके होती.त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी आजही कर्जत परिसरात 120 तीव्र कुपोषित आणि 37 कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे.रायगड जिल्हयातील कर्जत तालुका मुंबईचे उपनगर म्हणूनच ओळखला जातो असे असतानाही तेथे कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे नेरळ या शहरी भागात यातील 66 कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या कार्यपध्दतीबद्दलच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जत परिसरात एकात्मिक बालविकास विभागाचे दोन प्रकल्प कार्यालय असली तरी येथील प्रकल्प अधिकार्‍यांची पदे गेली काही दिवस रिक्त असल्याने कुपोषित बालकांना कोणी तारणहार उरला नसल्याचा आरोप केला जात आहे.-

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here