करमाळ्यात पुण्यनगरीची होळी,माध्यमांचा आवाज बंद कऱण्याचा आणखी एक प्रयत्न

0
1014

आपल्या रोधात बातमी आली की,संबधित दैनिकावर हल्ले करायचे,पत्रकारांना मारहाण करायची,किंवा ते जमले नाहीच तर दैनिकाची होळी करून माध्यमांवर दहशत बसविण्याचा प्रयत्न करायचा अशा घटना राज्यात सातत्यानं घडत आहेत.विरोधात बातम्या छापल्यमुळे देगलुर येथील साप्ताहिकाचे कार्यालय बुलडोझर लावून तोडल्याची घटना ताजी असतानाच आता करमाळा येथून देखील पुण्यनगरीच्या अंकाची होळी केल्याची बातमी आली आहे.राष्ट्रवादीच्या बागल गटाने हा प्रकार घडवून आणला आहे. बागल गटाचे स्थानिक नेते दिग्विजय बागल याची विशेष मुलाखत कालच्या अंकात प्रसिध्द झाली होती.मुलाखतीत आमदार नारायण पाटील याच्यावर जहाल भाषेत टीका करण्यात आली होती..या मुलाखतीला उत्तर देणारी नारायण पाटील यांची मुलाखत दुसर्‍या दिवशीच्या अंकात प्रसिध्द झाली .त्यांनी माजी आमदार श्यामल बागल यानी आपल्या आमदारकीच्या काळात विधानसभेत एकही प्रश्‍न उपस्थित केला नसल्याचा घणाघात केला. खरं म्हणजे पुण्यनगरीनं दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मुलाखती छापून निःपक्ष भूमिका घेतली होती.मात्र नारायण पाटील यांच्या मुलाखत राष्ट्रवादीचे बागल यांना आक्षेपार्ह वाटली.त्यामुळे त्यानी पुण्यनगरीच्या अंकाची जाहीर होळी केली.म्हणजे आपल्या बाजुने छापून आले की,ते वृत्तपत्र स्वातंत्र्य असते आणि आपल्या विरोधात काही छापले की,तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गैरवापर असतो हे सूत्र करमाळ्यात दिसले.बागल यांनी जी टीका नारायण पाटील यांच्यावर केली त्याला उत्तर देणारी मुलाखत दुसर्‍या दिवशी नारायण पाटील यांची छापली.खरं तर याला बागल यांनी आपल्या कामातून उत्तर देण्याऐवजी त्यानी थयथयाट करीत थेट पुण्यनगरीच्या अकाची होळी करून वृत्तपत्रे आणि स्थानिक पत्रकारांच्या मनात दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला आहे.बागल याचे म्ङणणे छापले गेले नसते तर त्याना त्रागा करता आला असता पण वृत्तपत्राने तटस्थ भूमिका घेतल्यानंतरही राष्ट्रवादीने अंकाची होळी केली आहे याबद्दल करमाळा येथील पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून अंकाची होळी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या कृत्याचा निषेध करीत आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here