पत्रकार संरक्षण कायद्या
साठी महाराष्ट्रातील पत्रकार तब्बल बारा वर्षे संघर्ष करीत होते.बारा वर्षांची ही लढाई जेवढी रोमहर्षक तेवढीच सनहशीलतेचा अंत पाहणारी होती.स्वतः एस.एम.देशमुख हे या सार्या घटनांचे साक्षीदार आहेत.बारा वर्षात हा लढा कशी वळणं घेत गेला,आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर चळवळ कशी हेलकावे खात होती याची सारी कथा एस.एम.देशमुख यांनी शब्दबध्द केली आहे.कथा एका संघर्षाची हे पुस्तक नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते 25 जून रोजी प्रकाशित होत आहे.108 पानांचं या पुस्तकाची किंमत 150 रूपये असली तरी प्रकाशनाच्या दिवशी हे पुस्तक केवळ 100 रूपयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रसिध्दपूर्व नोंदणी करणारांना देखील अवघ्या शंभर रूपयांमध्ये हे पुस्तक मिळणार आहे.प्रसिध्दपूर्व नोंदणीसाठी सुनील वाळूंज यांच्याशी 9822195297 या नंबरवर संपर्क साधता येईल. खर्च वजा जाता या पुस्तकाच्या विक्रीतून जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम राज्यातील गरजू पत्रकारांना मदत देण्यासाठी वापरली जाणार आहे त्यामुळं पुस्तक खरेदी करून आपण अप्रत्यक्ष चळवळीला मदत करणार आहोत.बारा वर्षाच्या लढयाचा हा ऐतिहासिक दस्ताएवज पत्रकारांच्या घरी असलाच पाहिजे..
विशेष सवलतः मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारं संघर्षाची पंच्याहत्तरी हे 250 रूपये किंमतीचे पुस्तक आणि कथा एका संघर्षाची हे 150 रूपयांचे किंमतीचे पुस्तक एकाच वळेस खऱेदी केल्यास 400 किंमतीची दोन्ही पुस्तकं केवळ 250 रूपयांमध्ये दिली जातील.यासाठी अगोदर नोंदणी करावी लागेल.पुस्तकं कुरिअरने पाहिजे असल्यास त्याचे 50 रूपये वेगळे द्यावे लागतील.