*कणकवली पत्रकार संघाच्यावतीने कोंडयेत वनराई बंधारा*  *२२५ पिशव्यांचा वापर करत उभारला ५० फुट बंधारा; सलग दुसऱ्या वर्षी जोपासली सामाजिक बांधिलकी*


पत्रकार केवळ लेखणीच्या माध्यमातूनच प्रश्‍नांना वाचा फोडतात असं नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक बांधिलकी जपत असतात.सिंधुदुर्ग जिल्हयातील पत्रकारांनी वनराई बंधारा बांधून राज्याला नवा आदर्श घालून दिलाय…कणकवलीच्या मित्रांचे आभार..


कणकवली / प्रतिनिधी :कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवलीच्यावतीने गेली दोन वर्षे सातत्यपुर्वक वनराई बंधाºयाचा उपक्रम राबविला जात आहे़ गेल्या वर्षी भिरवंडे व जानवली या दोन गावांमध्ये दोन वनराई बंधारे पत्रकारांनी स्वत: सहभाग घेत बांधले होते़ यावर्षी कोंडये तेलीवाडी येथील मंडये ओहोळ या ठिकाणी पत्रकारांनी श्रममदान करत वनराई बंधारा बांधला़ तब्बल ५० फुट लांबीच्या मातीच्या बांधाºयासाठी सीमेंटच्या २२५ बॅग वापरत हा बंधारा तब्बल ४० पत्रकारांनी सहभाग घेत बांधला आहे़ त्यामुळे सलग दुसºया वर्षी कणकवली पत्रकार संघाचा वनराई बंधाºयाचा उपक्रम समाजाप्रती एक आदर्श ठेवणारा ठरला आहे़कोंडये तेलीवाडी येथे कणकवली तालुका पत्रकारसंघाच्यावतीने वनराई बंधाºयाचा शुभारंभ सरपंच मनिषा मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला़ यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, तालुकाध्यक्ष भगवान लोके, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, अशोक करंबळेकर, भाई चव्हाण, विजय गावकर, महेश सावंत, अजित सावंत, संजय राणे, विशाल रेवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधीर राणे, नितीन कदम, विरेंद्र चिंदरकर, तुषार सावंत, संतोष राऊळ, संजोग सावंत, चंद्रशेखर तांबट, संतोष पाटणकर, विनोद जाधव, हेमंत वारंग, संजय पेटकर, रुपेश धोपटे, माणिक सावंत, गुरूप्रसाद सावंत, सचिन राणे, उत्तम सावंत, शशिकांत सातवसे, प्रदिप राणे, विराज गोसावी, तुळशीदास कुडतरकर, रमाकांत बाणे, पप्पू निमणकर, संतोष जाधव, सुधीर जोशी यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़पत्रकारांनी श्रमदान करत दुपारी २ वाजेपर्यंत या वनराई बंधाºयाची उभारणी पुर्ण केली़ मोठ्या क्षमतेने जलसंधारणासाठी या बंधाºयाचा उपयोग स्थानिक शेतकºयांना होणार आहे़ वनराई बंधाºयासाठी पत्रकारांनी श्रमदान करत एक आदर्श निर्माण केला आहे़ कोंडये येथे वनराई बंधाºयाचे काम सुरू असताना जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट दिली़ तसेच या वनराई बंधाराच्या कामानंतर माती परिक्षण संदर्भात प्रा़ चेतन प्रभू यांनी पत्रकारांना माहिती दिली़ हा बंधारा यशस्वी होण्यासाठी कोंडये गावातील सरपंच मनिषा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य उमेश मेस्त्री, माजी सरपंच अनिल मेस्त्री, हरकुळ माजी सरपंच आनंद ठाकूर, करंजे माजी सरपंच संतोष परब, अनंत आंबेरकर, विठोबा आंबेरकर, अनिकेत जेठे, सुशांत तेली, श्यामसुंदर शिवगण, धोंडू रेडकर, दिगंबर शिवगण आदी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य केले़

बॉक्स :वनराई बंधाºयातून जलसंधारणासाठी हातभार लागेल – भगवान लोकेकणकवली तालुका पत्रकार संघाने सामाजिक बांधलकीतून गेल्या दोन वर्षांपासून वनराई बंधाºयाचा उपक्रम हाती घेतला आहे़ भिरवंडे, जानवली या दोन गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले होते़ त्यानंतर यावर्षी कोंडये तेलीवाडी येथे हा पहिला बंधारा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांच्या सहकार्याने आम्ही पार पाडला़ या वनराई बंधाºयांसाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले़ केवळ बातमीदारी न करता सामाजिक बांधिलकीतून वनराई बंधारा बांधत समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे़ जेणेकरून जलसंधारणासाठी आमचा हातभार लागेल़ स्थानिक शेतकºयांना त्याचा लाभ होईल, अशी प्रतिक्रीया कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी दिली़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here