पत्रकार एस.बालाकृष्णन यांना ठार करण्याचा आखला होता प्लान
गुन्हे विषयाचे पत्रकार एस बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या शूटरला पोलिसांनी ठाण्याच्या मुंब्र्यातून अटक केली. अब्बास असे या आरोपीचं नाव आहे. बालाकृष्णन हे गुन्हे विषयाचे पत्रकार आहेत. त्यांनी दाऊदच्या दिल्ली जायका या हॉटेलची लिलावात खरेदी केली. दाऊदची मालमत्ता खरेदी करु नये यासाठी यापूर्वी त्यांना धमक्या आल्या होत्या. मात्र, त्यांनी आलेल्या धमक्यांना भीक न घालता लिलावात सहभागी होऊन हॉटेल खरेदी केले. बालाकृष्णन यांनी पोलीस संरक्षणही घेतलेलं नाही. त्यांच्या हत्येच्या कटाची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मुंब्र्यात कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे. –