कंगनाची अरेरावी

सत्ता असो, संपत्ती असो, प्रसिध्दी असो वा यशाची नशा एकदा डोक्यात शिरली की, माणसाचा सारासार विवेक हरवून जातो. सिनेक्षेत्रातील मंडळीच्या बाबतीत तर हा अनुभव वारंवार येतो.. ताजे उदाहरण कंगना रणौतचे आहे.. बाईचे एक दोन सिनेमे हिट झाले अन बाईसाहेब वाट्टेल ते बरळायला लागल्या काही पत्रकार बिकाऊ आणि देशद्रोही आहेत असा आरोप कंगनानं केला. हा आरोप करताना कंगना हे विसरली की, आपण ज्या क्षेत्रात आहोत तेथील अनेकांवर देशद़ोहाचे आरोप झालेले आहेत..
एका पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर कंगना भडकली. त्यानंतर पत्रकार आणि तिच्यात वाद झाले. या घटनेनंतर एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट गिल्ड ऑफ इंडियानं कंगनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत तिने पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली. कंगनानं माफी तर मागितली नाहीच उलट पत्रकारांनी माझ्यावर बहिष्कार घालून दाखवावाच असंआवहान दिलं.. कंगना हे प़सिधदीसाठी करतेय की तिचं डोकं ठिकाणावर नाही हे तपासावे लागेल..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कंगनाचया वक्तव्याचा धिक्कार करीत असून तिने पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी करीत आहे.. तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती, एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट गिल्ड ऑफ इंडियाचया बरोबर असल्याचे पत्रक हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी काढले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here