ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया यशस्वी

0
776

 ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया यशस्वी: शिरूर पत्रकार संघाने रचला नवा इतिहास

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुका अधिक पारदर्शक पध्दतीनं व्हाव्यात ,जास्तीत जास्त पत्रकारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असावा,आणि निवडणूक प्रक्रिया कमी खर्चिक,कमी वेळात पार पडावी यासाठी परिषद आणि परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.त्यानुसार आज पुणे जिल्हयातील शिरूर (घोडनदी) तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका आज ऑनलाईन घेतल्या गेल्या.राज्यात प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन निवडणुकांकडे संपूर्ण राज्यातील पत्रकारांचे लक्ष होते.ठरल्यानुसार पत्रकार सदस्यांनी 10 ते 2 या वळेत आपआपल्या मोबाईलवरून पसंतीच्या उमेदवारास मतदान केले.51 मतदार होते.त्यापैकी तब्बल 50 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.99 टक्क्याच्या वर हे मतदान झाले आहे.केवळ ऑनलाईन पध्दतीमुळंच हे शक्य झालं आहे.मतदान संपल्यानंतर दुसर्‍या मिनिटाला निवडणूक निकाल लोकांसमोर आला.त्यानुसार सुनील भांडवलकर हे अध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले.त्यांना 29 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अभिजित अंबेकर यांना 21 मते मिळाली.हा निकालही मतदाारांना ऑनलाईन पहाता आला.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतल्या गेलेल्या या निवडणुकाबद्दल शिरूरमधील पत्रकारांना कमालीची उत्सुकता होती.सर्वानी परिषदेच्या या प्रयत्नांचे कौतूक केले आहे.भविष्यात प्रत्येक जिल्हयात आणि 2017 च्या परिषदेच्या निवडणुकांतही याच पध्दतीचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.शिरूरच्या ऑनलाईन निवडणुका यशस्वीपणे पार पडाव्यात यासाठी विभागीय चिटणीस शरद पाबळे,जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गोरे,उपाध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनायक कांबळे,सह निवडणूक अधिकारी सुनील वाळूंज यांच्यासह शिरूरमधील आणि जिल्हयातील पत्रकारांनी सहकार्य केले.त्याबद्दलही एस.एम.देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.पुण्यातील तरूण इंजिनिअर्सनी एकत्र येत सुरू केलेल्या फ्युचरटेक आयटी सोल्युशन्स पुणे या कंपनीने निडणुकीची तांत्रिक जबाबदारी पार पाडली.त्यासाठी त्यानी नवीन सॉफ्टवेअऱ विकसित केले आहे.विजयी उमेदवाराचे अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here