एस.एम.देशमुख यांना हुतात्मा गौरव पुरस्कार 

मुंबईः नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणारा मानाचा हुतात्मा गौरव पुरस्कार यावर्षी मराठी पत्रकार परिषदेेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख तसेच इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांना जाहीर झाला आहे.येत्या 2 जानेवारी रोजी म्हणजे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनी दुपारी साडेचार वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे.राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ विचारवंत विश्‍वंभर चौधरी यांच्या हस्ते एस.एम.देशमुख आणि कोळंबे यांना सन्मानित केले जाणार आहे.

समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या मान्यवरांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे.गतवर्षी हा पुरस्कार हिवरेबाजारचे संरपंच पोपटराव पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुसया पादीर यांना देण्यात आला होता.

एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर गेली वीस वर्षे सातत्यानं सघर्ष करीत पत्रकारांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत.ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी तसेच पत्रकारांवरील वाढत्या हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा यासाठी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पत्रकारांचा व्यापक लढा उभारला गेला आहे.तो लढा आता यशस्वी होताना दिसत असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा कऱण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.मुंबई-गोवा महामार्गसाठीही देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकालीन लढा उभारले गेला होता अंतिमतः तो यशस्वी झाला असून या महामार्गाचे कामही सुरू झाले आहे.देशमुख यांनी इतरही अनेक सामाजिक प्रश्‍न हाती घेऊन कधी लेखणीच्या माध्यमातून तर कधी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करीत जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.देशमुख यांनी केलेल्या या कार्याची पुरस्कार निवड समितीने दखल घेऊन त्यांना सन्मानित कऱण्याचा निर्णय घेतला हुतात्मा स्मारक समितीच्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुरस्कार वितऱण सोहळ्याच्या वेळेस दोन्ही हुतात्म्यांच्या अलौकीक इतिहासाची आठवण करून देणारा आणि स्मारक समितीच्या कार्याचा आढावा घेणारी पुस्तिका प्रकाशित कऱण्यात येणार असून नेरळ ग्रामपंचायतीने हुतात्मा चौकात नव्याने उभारलेल्या स्मारकाचे लोकार्पण देखील केले जाणार असल्याची माहिती स्मारक समितीचे ÷अध्यक्ष संतोष पेऱणे ,उपाध्यक्ष दर्वेश पालकर आणि कर्जत प्रेस क्लबचे संजय मोहिते यांनी दिली आहे.या कार्यक्रमास पत्रकार आणि जनतेनं मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here