एस.एम.देशमुख बीड जिल्हयाच्या दौर्‍यावर 

0
935

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष, तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख 12 नोव्हेंबर पासूनच तीन दिवस बीड जिल्हयाच्या दौर्‍यावर असून ते विविध ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत .  25 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार्‍या तालुका अध्यक्षांच्या मेळव्याची तसेच पत्रकार पत्रकार संरक्षण कायदा,पेन्शनबाबतच्या सरकारी वेळकाढू धोरणाची माहिती पत्रकारांना देण्यात येईल

 १२नोव्हेंबर रोजी  दुपारी 12च्या सुमारास आष्टी येथील पत्रकारांना देशमुख भेटतील .त्यानंतर दुपारी 3 वाजता पाटोदा येथील पत्रकारांशी संवाद साधून त्यांचे प्रश्‍न समजावून घेतील.

1४  नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता धारूर येथे परिषदेचे विभागीय चिटणीस अनिल महाजन यांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार होणार असून चार वाजता केज येथे तालुका पत्रकार संघाच्या एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख उपस्थित राहणार आहेत.बीड जिल्हयातील पत्रकारांची भक्कम एकजूट करून पत्रकारांना भेडसावणार्‍या समस्यांना कसे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन देशमुख ठिकठिकाणी करणार आहेत.

देशमुख यांच्या बीड जिल्हा दौर्‍यात   त्या त्या भागातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विभागीय सचिव अनिल महाजन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here